शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

११ हजार शेतक-यांचे साडेनऊ कोटी अनुदान रखडले!

By admin | Updated: June 21, 2016 23:27 IST

सिंदखेडराजा तालुक्यातील ११ हजार शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित; ३९ हजार शेतक-याना मदतीचे वाटप.

काशिनाथ मेहेत्रे / सिंदखेडराजा (जि. बुलडाणा) सिंदखेडराजा तालुक्यातील शेतकर्‍यांना २५ जानेवारी २0१६ पासून अनुदानाचे वाटप करण्यात येत आहे. ३१ मार्च १६ पर्यंंत ३९0४७ शेतकर्‍यांना २५ कोटी ६३ लाख ६९ हजार ७९६ रुपयांच्या अनुदानाचे वाटप करण्यात आले; परंतु आजपर्यंत शासनाकडून अनुदान प्राप्त न झाल्यामुळे ११२९५ शेतकर्‍यांचे ९ कोटी ३५ लाख ९८ हजार ८0४ रुपये अनुदान रखडले आहे. सन २0१५ ला खरिपाचे पीक हातचे गेल्यामुळे तालुक्यातील ५0३४२ शेतकर्‍यांचे ५२६७0 हेक्टरवरील पीक वाया गेल्यामुळे त्यांना ३५ कोटी ८१ लाख ५७ हजार ३६0 रुपयांची मदत शासनाने देण्याची घोषणा केली. त्यापैकी ११२९५ शेतकर्‍यांचे ९ कोटी ३५ लाख ९८ हजार ८0४ रुपये अनुदान रखडले ते अनुदान त्यांना पेरणीसाठी मिळावे, अशी मागणी शिवसेनेचे अनिल मेहेत्रे यांनी तहसीलदारांकडे १९ जून रोजी केली आहे. ज्या शेतकर्‍यांचे बँकेतील खाते नंबर तलाठय़ाकडे प्राप्त झाले, अशा ६४४६ शेतकर्‍यांना अनुदान देण्यासाठी २३ मे २0१६ रोजी ९ कोटी ३५ लाख ९८ हजार ८0४ रुपये अनुदानाची मागणी शासनाकडे करण्यात आली. शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडला असून, पेरणी करण्यासाठी त्यांच्याकडे पैसा नाही, त्यामुळे काळ्या आईची ओटी भरण्यासाठी माय माउल्यांच्या अंगावरील मंगळसूत्र, दागदागिने विकून बी-बियाणे, खतांची जुळवाजुळव करताना शेतकरी दिसत आहे. शासनाने बळीराजाला मदत देण्याचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी अनिल मेहेत्रे, कैलास मेहेत्रे यांनी केली आहे.