शहरं
Join us  
Trending Stories
1
लज्जास्पद! केरळीयन लोकांच्या कार्यक्रमात शाहिद आफ्रिदीचे जोरदार स्वागत; Video पाहून नेटकरी संतापले...
2
रशियाच्या S-400 नं युक्रेनचं F-16 पाडलं, पुतिन यांनी जवानांना मोठं बक्षिस दिलं; अमेरिकेचं मात्र टेन्शन वाढलं!
3
Vaishnavi Hagawane Death Case:वैष्णवीच्या बाळाचा ताबा आजीकडे;बालकल्याण समितीचा मोठा निर्णय
4
कोलंबियाची ४८ तासांत कोलांटी उडी! शशी थरूरनी शाळाच घेतली; पाकिस्तानच्या बाजुने केलेले वक्तव्य मागे घ्यायला लावले
5
मे महिना संपायला अन् खाद्य तेलाच्या किंमती कमी करायला...; केंद्राने आयात शुल्क निम्म्याने घटविले...
6
भारतीयाचा अमेरिकेच्या रस्त्यावरच ग्रँड विवाह सोहळा; वॉल स्ट्रीटच बंद केला, कोण आहे ही व्यक्ती? तुम्हीही घेऊ शकता भाड्यानं जागा
7
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
8
'या' ४ ठिकाणी पत्नी मिळवून देऊ शकते जबरदस्त नफा; पाहा कोणत्या आहेत या स्कीम्स?
9
"हे असं अर्धवट..."; सुदेश म्हशिलकरांच्या लेखी तक्रारीवर प्राची पिसाटची आगपाखड, चांगलीच भडकली
10
आजचे राशीभविष्य: शनिवार 31 मे 2025; खर्चाचे प्रमाण वाढेल, एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो
11
'केईएम'मध्ये पुन्हा पाणी साचायला नको, उपाययोजनांसह प्रतिज्ञापत्र सादर करा : हायकोर्ट
12
युद्धनौका, पाणबुड्यांची नावे, ठावठिकाणा वर्माने पाकला पुरवला; कोठडीत रवानगी
13
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
14
राज्यात साडेएकवीस हजार शासकीय वाहने भंगारात; अपघातांसह प्रदूषणास बसेल आळा
15
गेट लॉस्ट, मि. मस्क! दुसऱ्याच्या पदच्युतीसाठी किमान चार वर्षे लागतील
16
गाळ टाकण्याच्या जागेतही हेराफेरी; लॉगशीटवर गुंदवली, माल उतरवला दिवे गावात!
17
विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे यांचे स्पष्टीकरण
18
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
19
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही

जि.प. सीईओविरूद्ध अविश्वासाच्या हालचाली

By admin | Updated: June 22, 2016 00:26 IST

जिल्हा परिषदेतील विविध विभागांतर्गत सुरू असलेल्या कामकाजात मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर

सर्वपक्षीय बैठकीत एकमत भंडारा : जिल्हा परिषदेतील विविध विभागांतर्गत सुरू असलेल्या कामकाजात मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर हे पदाधिकारी व जिल्हा परिषद सदस्यांना विश्वासात घेत नाहीत, असा आरोप करून सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याविरूद्ध अविश्वास प्रस्ताव आणण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासंदर्भात मंगळवारला बैठक दुपारी बैठक घेऊन यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.जिल्हा परिषदेंतर्गत मे महिन्यात बदली प्रक्रिया राबविण्यात आली. त्यावेळी या प्रक्रियेत पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतले जाईल, असे सांगण्यात आले होते. परंतु या बदली प्रक्रियेत अनियमितता दिसून आली. याप्रकरणी विभागीय आयुक्तांकडे तक्रार केल्यानंतर आयुक्तांनी या बदल्यांना स्थगिती दिली आहे. आता या शिक्षकांना बदली स्थगितीचे पत्र देण्याची गरज असताना कार्यकारी अधिकाऱ्यांनी शिक्षकांना त्याबाबत पत्र दिले नाही. त्यामुळे या शिक्षकांचे वेतन कसे निघणार असा प्रश्न करून या सर्व प्रक्रियेला मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर जबाबदार असल्याचा आरोप शिक्षण सभापती राजेश डोंगरे यांनी केला आहे. निंबाळकर यांच्याविरुद्ध अविश्वास आणण्यासाठी काँग्रेसने त्यांचे नेते सेवक वाघाये, राष्ट्रवादीने प्रदेश महासचिव धनंजय दलाल यांच्याशी केली. भाजपचे गटनेते अरविंद भालाधरे यांनीही वरिष्ठांची चर्चा केली आहे. या बैठकीत अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर, उपाध्यक्ष राजेश डोंगरे, सभापती नरेश डहारे, सभापती विनायक बुरडे, सभापती नीळकंठ टेकाम, सभापती शुभांगी रहागंडाले यांच्यासह भाजपचे गटनेते अरविंद भालाधरे व काही सर्वपक्षीय सदस्य उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)