शहरं
Join us  
Trending Stories
1
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
2
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
3
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
4
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
5
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
6
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
7
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
8
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
9
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
10
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
11
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
12
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
13
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
14
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
15
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
16
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
17
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
18
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
19
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
20
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद अध्यक्षांचा उपोषणाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 21:32 IST

विविध विकास कामांचे नियोजन करून आवश्यक निधीची मागणी जिल्हा नियोजन समितीकडे करण्यात आली. तीन-चारवेळा जिल्हाधिकाऱ्यांकडे निधीबाबत मागणी करूनही अद्याप निधी प्राप्त झाला नाही.

ठळक मुद्देविकास निधी : जिल्हाधिकाऱ्यांकडून निधीच प्राप्त नाही

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : विविध विकास कामांचे नियोजन करून आवश्यक निधीची मागणी जिल्हा नियोजन समितीकडे करण्यात आली. तीन-चारवेळा जिल्हाधिकाऱ्यांकडे निधीबाबत मागणी करूनही अद्याप निधी प्राप्त झाला नाही. येत्या चार दिवसात निधीचे वितरण न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा चक्क जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे यांनी दिला आहे.तीन महिन्यापुर्वी जिल्हा वार्षिक नियोजन लेखाशिर्ष ३०५४ व ५०५४ अंतर्गत भंडारा जिल्हा परिषदेने इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग यांच्या विकास कामाचे नियोजन करून आवश्यक निधीची मागणी जिल्हा नियोजन समितीकडे केली होती. त्यानंतर तीन ते चार वेळा जिल्हा परिषदेने प्रस्तावित निधी देण्याबाबत जिल्हाधिकाºयांकडे मागणी केली. परंतु जिल्हाधिकाऱ्यांकडून निधी प्राप्त झाला नाही.महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाच्या ६ आॅक्टोबरच्या निर्णयानुसार जिल्हा वार्षिक योजनेतील लेखानिर्ष ३०५४ व ५०५४ अंतर्गत प्राप्त होणाºया निधीतून इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग यांच्या कामाच्या अनुशंगाने कार्यान्वीत यंत्रणा निवडण्याबाबत पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हानिहाय समिती गठित केली होती.शासनाच्या सदर निर्णयाविरोधात भंडारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रमेश डोंगरे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात रिठ याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर दिलेल्या आदेशानुसार या शासन निर्णयाला स्थगिती दिली आहे. त्यानंतर मंजूर निधी जिल्हा परिषदेला वितरित करण्याबाबत जिल्हाधिकाºयांकडून मागणी करण्यात आली.परंतु अद्यापही निधी वितरणाची कारवाई जिल्हाधिकारी कार्यालयाकडून झाली नाही. चार दिवसाच्या आत निधी वितरण करण्यात न आल्यास जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांसह जिल्हा परिषद अध्यक्ष उपोषणाला बसणार आहे. आता प्रशासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.