शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Morcha Update Live: "आंदोलनाची परवानगी वाढवून द्या, मी इथून उठणार नाही"; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
"आरक्षणाचा गुलाल डोक्यावर पडल्याशिवाय आता इथून हलायचं नाही..."; मनोज जरांगे यांचा निर्धार
3
पंतप्रधान मोदींच्या कामावर देश खुश की नाराज? नव्या सर्वेक्षणात जनतेचा मोठा खुलासा!
4
Manoj Jarange: "मी शेवटपर्यंत मॅनेज होणार नाही", मनोज जरांगेचा सरकारला इशारा!
5
Mumbai Traffic: जरांगे मुंबईत! आझाद मैदान गच्च भरलं; सीएसएमटी, फोर्ट परिसरात मोठी वाहतूक कोंडी
6
Danish Malewar Double Century : विदर्भकराची कमाल; पदार्पणाच्या सामन्यात द्विशतकासह रचला इतिहास
7
भारतावर ५०% टॅरिफ पण, अमेरिका शेजारील देशांवर मेहेरबान! चीन ते पाकिस्तान कुणावर किती शुल्क?
8
विशेष लेख: उद्धव-राज आणि फडणवीस : काहीतरी 'मेख' आहे!
9
Manoj Jarange Patil: मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला
10
पंतप्रधान मोदी ७५ वर्षांचे झाल्यावर निवृत्ती घेणार? सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले- "RSS..."
11
उत्तराखंडच्या चमोलीमध्ये ढगफुटीची; ढिगाऱ्यामुळे काही क्षणात अनेक लोक बेपत्ता; बचावकार्य सुरू
12
आजचे राशीभविष्य, २९ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, प्रवास संभवतो, गोड बोलून काम पूर्ण करू शकाल
13
Ganesh Visarjan: दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप! मुंबईत दुसऱ्या दिवशी ५९,४०७ गणपती मूर्तींचे विसर्जन
14
२८०० वाहनांमधून आंदोलक मुंबईत १५ दिवसांचा शिधा घेऊन आलोय; गावनिहाय बांधव मुंबईत, गाडीत राहण्यासह जेवणाची सोय
15
गणेशमूर्ती अर्धवट सोडून पळालेल्या डोंबिवलीतील 'त्या' मूर्तिकाराला अखेर अटक
16
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  
17
जरांगेंच्यां आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर १५०० हून अधिक पोलिसांची फौज
18
मोदींच्या आईबद्दल अवमानकारक भाषा, काँग्रेस बनला शिवीगाळ करणारा पक्ष; भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांची खरमरीत टीका
19
गुरुजींसाठी नवे वेळापत्रक; गुणवत्ता वाढवा; प्रशासकीय जबाबदाऱ्याही घ्या

जिद्द, कष्टातून गाठले यशोशिखर

By admin | Updated: April 7, 2015 01:24 IST

एमपीएससी परीक्षेत यश : सर्वसामान्य कुटुंबातील मुलांची कामगिरी

कोल्हापूर : जिद्द, कष्ट आणि चिकाटी या त्रिसूत्रीच्या जोरावर कोल्हापूर जिल्ह्यातील मध्यमवर्गीय, सर्वसामान्य कुटुंबातील तरुण-तरुणींंनी राज्य लोकसेवा आयोगाच्या अंतिम परीक्षेत यश मिळविले आहे. यशोशिखर गाठण्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट, केलेले प्रयत्न ‘लोकमत’शी बोलताना मांडले.कुटुंबीयांचा विश्वास सार्थ ठरविला‘यूपीएससी’च्या मुख्य परीक्षेत दोनवेळा अपयशी ठरलो; पण कुटुंबीयांचा दृढ विश्वास माझ्यावर होता. तहसीलदार पदाच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन त्यांचा विश्वास सार्थ ठरविल्याचा आनंद होत आहे. माझं मूळ गाव पेठवडगाव. वडील शासकीय सेवेत असल्याने सध्या कोल्हापुरातील युनिक पार्कमध्ये राहते. कुटुंबीयांची इच्छा होती की, शासकीय सेवेत मी करिअर करावे. त्यासाठी प्री-आयएएस ट्रेनिंग सेंटरमध्ये प्रशिक्षण घेऊ लागले. तेथील तयारीच्या जोरावर ‘यूपीएससी’च्या मुख्य परीक्षेपर्यंत धडक मारली; पण काही गुणांनी अपयश आले. मात्र, अभ्यास सोडला नाही. गटचर्चा आणि लॉजिकवर भर देऊन तयारी केल्याने सहायक गटविकास अधिकारी पदाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. मात्र, त्या पदावर रूजू न होता पुन्हा अभ्यास सुरू केला आणि त्यामुळे आता तहसीलदारपदाच्या परीक्षेत यश मिळविता आले. - श्वेता शशिकांत पाटोळे५आईने बळ दिले...माझे मूळ गाव चिपळूण (रत्नागिरी) पण, माझा जन्म झाला कोल्हापुरातील उचगावमधील उफळे कॉलनीत. वडिलांचे निधन झाल्यानंतर कुटुंबाची सर्व जबाबदारी आई लता यांनी पेलली. शिक्षणासाठी तिने पाठबळ दिले. पदवीचे शिक्षण घेताना स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. त्याच्या जोरावर २०१२-१३ मध्ये ‘यूपीएससी’च्या मुलाखतीपर्यंत धडक दिली; पण सहा गुणांनी संधी हुकली. या अपयशाने जिद्द सोडली नाही. अभ्यासात सातत्य ठेवत युनिक अकॅडमीमध्ये दोन वर्षे कोचिंग केले. सध्या विजेता अकॅडमी, प्री-आयएएस ट्रेनिंग सेंटरमध्ये व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून जात होतो. त्यासह दिवसांतील सात तास अभ्यास आणि तीन तास गटचर्चा करत होतो. त्याची उपजिल्हाधिकारीपदाच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी मदत झाली. ‘आयएएस’चे माझे ध्येय असून, ते साध्य करण्यासाठी यापुढे प्रयत्न राहणार आहेत.- गणेश भिकाजी महाडिक