शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू; दोन जखमी

By admin | Updated: March 18, 2015 00:45 IST

आठवडी बाजारातून गावाकडे परत येत असताना सुकळी (नकुल) देवरी (देव) मार्गावरील नाल्यानजीक मोटर सायकलला अपघात झाला.

चुल्हाड (सिहोरा) : आठवडी बाजारातून गावाकडे परत येत असताना सुकळी (नकुल) देवरी (देव) मार्गावरील नाल्यानजीक मोटर सायकलला अपघात झाला. यात एकाचा मृत्यू तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारला सायंकाळी ७ वाजता घडली. सुरज नान्हे (३५) रा.देवरी (देव) असे मृत तरुणाचे नाव आहे. तुमसर तालुक्यातील सुकळी (नकुल) या गावी सोमवारला आठवडी बाजार असल्याने देवरी (देव) येथील सूरज नान्हे (३५), संजय नागपुरे (२८), शास्त्री नेवारे (३५) हे तिघे बाजारात खरेदीसाठी गेले होते. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी सुरु झाल्याने तिघांनी गावाकडे परतण्यासाठी आठवडी बाजारात उशिर केला. परंतु तासभरानंतर पावसाची रिपरीप थांबत नसल्याने सायंकाळी ७ वाजता गावाकडे परतण्यासाठी तिघे निघाले. संजय नागपुरे यांच्या मालकीची एम.एच. ३६ डी २२८३ या क्रमांकाची ही मोटर सायकल होती. (देव) गावाच्या अगदी हाकेच्या अंतरावर आल्यानंतर नाल्यानजीक त्यांच्या मोटर सायकलला वन्य प्राणी वानडुकरांचा कळप त्यांना मार्गावरून आडवा जात होता. त्यांना वाचविण्यासाठी संजयने ब्रेक दाबला. यात संतुलन बिघडल्याने डांबरीकरण रस्त्यावर तिघेही आदळले. यात सूरज नान्हे (३५) या तरुणाा जागीच मृत्यू झाला. तर काही अंतरावर संजय आणि शास्त्री नामक तरुण फेकल्या गेले. यात संजयच्या डोक्याला जबर जखम झाल्याने त्याला नागपुरला हलविण्यात आले. तर शास्त्री नामक तरुणाला हात आणि डोक्याला दुखापत झाली असून सिहोऱ्याच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारानंतर सुटी देण्यात आली आहे. मृतक सूरज नान्हेचे शव शवविच्छेदनासाठी तुमसरच्या उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे. तपास ठाणेदार रमेश इंगोले करीत आहेत. (वार्ताहर)