शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

तुमसरला हरित शहर बनविणार

By admin | Updated: May 10, 2017 00:32 IST

शहरात पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेता भविष्यात पर्यावरणाचे संतुलन राखण्याकरिता न.प. च्या वतीने तीन वर्षात तीन हजार वृक्ष लागवड करून ....

प्रदीप पडोळे : तीन वर्षात तीन हजार झाडे लावण्याचा संकल्पलोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : शहरात पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेता भविष्यात पर्यावरणाचे संतुलन राखण्याकरिता न.प. च्या वतीने तीन वर्षात तीन हजार वृक्ष लागवड करून शहराला हरित शहर बनविणार असल्याचे प्रतिपादन नगराध्यक्ष प्रदीप पडोळे यांनी केले. भंडारा वनविभागांतर्गत आयोजित हरित सेना चित्ररथाच्या स्वागत समारंभाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मंचावर उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम साळी, एस.सी.एफ. कोडापे, नगरसेवक रजनीश लांजेवार, राहुल डोंगरे आदी उपस्थित होते. यावेळी पडोळे यांनी, राज्य शासनाने वृक्षारोपणाचे महत्व नागरिकांना पटवून देण्याकरिता चांदा ते बांदा हरितसेना चित्ररथ तयार करून राज्यात जनजागृती करीत आहे. १ जुलै ते ७ जुलै या कालावधीत ४ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट्य असून तीन वर्षात ५० कोटी वृक्ष लागवडीचे लक्ष्य ज्याप्रमाणे ठेवले आहे. त्याच धर्तीवर न.प. तुमसरचा देखील दरवर्षी हजार वृक्षाप्रमाणे तीन वर्षात ३००० वृक्ष लागवड करण्याचा मानस आहे. केवळ वृक्ष लागवड करून सोडून देणे हे उद्देश नसून प्रत्येक झाडाच्या वाढीकरिता ट्री गार्ड व पोषक खताचा वापर करून त्या वृक्षांना मोठे करण्याची प्रमाणिक जबाबदारी सर्व नगरसेवक व न.प. कर्मचाऱ्यांनी स्वीकारली आहे. त्यामुळे लवकरच तुमसर शहर हरित शहरात परावर्तीत होईल असेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तुमसर वनपरिक्षेत्र अधिकारी अरविंद जोशी यांनी केले. तर कार्यक्रमाचे संचालन व आभार उमाकांत राहांगडाले यांनी मानले. कार्यक्रमाकरिता लेंडेझरी वनपरिक्षेत्र अधिकारी मडावी, माकडे व तुमसर, लेंडेझरी, नाकाडोंगरी परिक्षेत्रातील वन कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.