शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
5
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
6
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
7
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
8
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
9
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
10
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
11
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
12
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
13
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
14
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
15
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
16
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
17
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
18
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
19
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
20
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

तुमसरात सहा घरफोड्या

By admin | Updated: January 27, 2015 23:26 IST

शहराची सुरक्षा करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांचे घरमालकाच्या घरासह दुसऱ्या एका पोलिसाचे घर चोरट्यानी फोडले. याशिवाय अन्य सहा घरे चोरट्यांनी प्रजासत्ताक दिन पूर्व व नंतर फोडून

तुमसर : शहराची सुरक्षा करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांचे घरमालकाच्या घरासह दुसऱ्या एका पोलिसाचे घर चोरट्यानी फोडले. याशिवाय अन्य सहा घरे चोरट्यांनी प्रजासत्ताक दिन पूर्व व नंतर फोडून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाले. श्रीरामनगर व विनोबा भावे नागरातील नागरिकांत दहशतीचे वातावरण आहे.शहरातील श्रीरामनगर दाट लोकवस्तीचे व अतिमहत्वाच्या लोकांचे समजले जाते. रविवारी पहाटे चारच्या सुमारास तुमसरचे उपविभागीय पोलिस अधिकारी आनंद भोईटे यांच्या घरमालकांचे घर चोरट्यांनी फोडले. संतोष खूमन चौधरी यांच्या घरी चोरी झाली. उपविभागीय पोलिस अधिकारी आनंद भोईटे याच घरी भाड्याने राहतात.चोरट्यांनी घरी कुणी नाही याच संधीचा फायदा घेतला. आलमारीतील सामान अस्तव्यस्त त्यांनी फेकून दिला. घरातील मोबाईल चोरट्यांनी लंपास केला. त्यात काही चांदीच्या दागीन्यांचाही समावेश आहे. सोमवारी मध्यरात्री विनोबा नगरातील तथा पोलिस विभागात कार्यरत पोलिस फुंडे यांचे घरही चोरट्यांनी फोडले. २० हजार नगदी व साड्या चोरीला गेल्या. कृष्णा पटले यांचे घरातील ५ तोळे सोन्यांचे दागीने, तसेच कृष्णा पानतावणे, श्यामसुंदर धुर्वे, सुरचंद पांडे, रामदास साखरकर यांचे बंद घर फोडून चोरट्यांनी हात साफ केला. चोरटयांनी जी घरे कुलूपबंद होती त्या घरांनाच येथे लक्ष्य केले होते.श्रीरामनगर व विनोबा भावे नगर ही वरची गजबजलेली व नावाजलेली आहे. नोकरदार व लोकप्रतिनिधींचेही वास्तव्य याच परिसरात आहे. ज्या घरी उपविभागीय पोलिस अधिकारी आनंद भोईटे हे भाड्याने राहत आहेत. त्याच परिसरात नवनिर्वाचित आमदार चरण वाघमारे यांचे वास्तव्य आहे. मानवअधिकार आयोगाचे अध्यक्ष सुध्दा याच परिसरात राहतात. त्यामुळे हा परिसर व्हीआयपी मानला जातो. चोरट्यांनी येथे चोरीचे धाडस केले. प्रजासत्ताक दिन पूर्व व नंतर पोलिसांची गस्त होती हे विशेष. चोरट्यांची टोळी परप्रांतीय तथा दुसऱ्या शहरातील असेल असा तर्क लावला जात आहे. चोरट्यांचा अद्याप शोध सुरु आहे. दोन दिवसापासून तुमसर पोलिसांनी सापळा रचून गस्त वाढविल्याचे सांगण्यात येते.आमदारांनी घेतल्या कानपिचक्या पोलिस ठाण्यात आयोजित कबड्डी स्पर्धेचे उद्घाटनप्रसंगी बोलताना आमदार चरण वाघमारे यांनी चोरी प्रकरणात पोलिसांच्या कानपिचक्या घेतल्या. उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांचे घरमालक व एका पोलिसांच्या घरी घरफोडी झाली तर शहर व या ठाण्यांतर्गत ३२ गावे कशी सुरक्षित आहे, असा प्रश्न उपस्थित केला. ज्यांच्यावर सुरक्षेची जबाबदारी आहे तेच येथे सुरक्षित दिसत नाही. चोरट्यांच्या शोध व वचक ठेवण्याची येथे गरज आहे.पोलिस विभाग व शहरातील प्रत्येक बुथनिहाय सुरक्षादल निर्माण करुन समन्वय साधण्याची येथे गरज आहे. सुरक्षा दल गठीत करण्याचे निर्देश आमदार चरण वाघमारे यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी आनंद भोईटे, पोलिस निरीक्षक किशोर गवई यांना दिले. (तालुका प्रतिनिधी)