शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

दारूबंदी विरोधात महिलांची रॅली

By admin | Updated: October 26, 2016 00:49 IST

ग्रामपंचायतमध्ये महिलांची ग्रामसभा घेवून अवैध धंदे बंद करण्याचा ठराव घेण्यात आला.

गोंडउमरी येथे उपक्रम : महिलांची व्यसनमुक्ती समिती गठितगोंडउमरी : ग्रामपंचायतमध्ये महिलांची ग्रामसभा घेवून अवैध धंदे बंद करण्याचा ठराव घेण्यात आला. त्यात ९० टक्के महिलांची व्यसनमुक्ती समिती गठित करून शुभांगी चांदेवार यांना अध्यक्षपद देण्यात आले. व्यसनमुक्त समिती व तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष पौर्णिमा भागवत चांदेवार या दोन्ही महिलांच्या नेतृत्वात गाव व्यसनमुक्त करणे, अवैध व्यवसाय बंद करून दारूविक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याकरीता रॅली काढण्यात आली. त्यात शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या.गोंडउमरी या गावात पूर्वी मोठ्या प्रमाणात २०-२५ दुकाने, पानटपरीत दारू विक्री केली जायची. अशा अवैध व्यावसायीकांना अभय देत होते. या भागात रोज मद्यपीची यात्राच भरत होती. दारूवाल्यांची दादागीरी वाढत होती. गावातील शाळकरी मुले, दारूच्या आहारी गेली होती. कित्येक कुटूंबियांना दारूचे ग्रहण लागले होते. परंतू वेळोवेळी निवेदने, ठराव देऊन पोलीस दारूची दुकाने सुरू राहण्याकरीता छूपा पाठींबाच देत होते. नंतर महिलांनी पुढाकार घेतला. तंटामुक्तीचे अध्यक्ष पोर्णिमा चांदेवार यांना केले. व्यसनमुक्ती समिती स्थापना करून शुभांगी चांदेवार यांना अध्यक्ष करीत या महिलांच्या नेतृत्वात धंद्यावाल्यांना धडा शिकविण्याचा चंग बांधला. आणि दारूबंदी केली. महिलांच्या नेतृत्वात गावात रॅली काढण्यात आली. या रॅलीत, अवैध दारू, सट्टापट्टी, जुगार बंद करणे, व्यसनाचे दुरूपयोग, दारूसोडा, संसार जोडा अशाप्रकारे घोषणा दिल्या. गावात जनजागृती करून महिलांना संघटीत केले. भागातली काही अंशी दारूबंदी झाल्याने इथले मद्यपी वांगी गावात जावून हौस भागवितात. त्यामुळे महिलांना त्रास होतो. दारूवाल्यांना पोलिसांचे पाठबळ असल्याचा आरोप पोर्णिमा चांदेवार, शुभांगी चांदेवार यांनी केला. या रॅलीत लीला इरले, पुष्पा सयाम, आशा आगाशे, कुसुम चांदेवार, वृक्षाला मेश्राम, बबीता मोटघरे, सुकेसिनी मोटघरे, शांता राखडे, कमला राऊत, रंजना नेवारे, शालु मसराम यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)