शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

‘मदर्स डे’निमित्त पोलीस विभागातर्फे महिला मेळावा

By admin | Updated: May 11, 2017 00:26 IST

पोलीस मुख्यालय येथील सभागृहात पोलीस अधीक्षक विनिता साहु यांच्या अध्यक्षतेखाली ‘मदर्स डे व वुमन्स डे निमित्त महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पोलीस मुख्यालय येथील सभागृहात पोलीस अधीक्षक विनिता साहु यांच्या अध्यक्षतेखाली ‘मदर्स डे व वुमन्स डे निमित्त महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मृणाल जामदार डॉ. सुधाजी तिवारी, डॉ. अंकिता बोहरे, अप्पर पोलीस अधीक्षक रश्मि नांदेडकर आदी उपस्थित होते. मृणाल जामदार यांनी आयुर्वेद विषयाबाबत माहिती दिली. डॉ. अंकिता बोहरे यांनी लघुउद्योग विषयावर माहिती दिली. डॉ. सुधा तिवारी यांनी सर्वसामान्य महिलावंर होणाऱ्या ताणतणाव मुळे शरीरावर होणाऱ्या आजारांविषयी माहिती दिली. यावेळी पोलीस अधीक्षक विनीता साहू यांनी पोलीस दलातील महिला पोलिसांनी दैनंदिनी बाबी विषयी शिस्त पाळायला पाहिजे. कर्तव्य करीत असताना महिलांना पारिवारिक अडचणी येत असतात. जर त्यांना काही अडचणी असतील तर त्यांनी नि:संकोचपणे अडीअडचणी सांगितल्या पाहिजे. त्यांच्या समस्येचे निराकरण करू. कुटंूबातील महिला सदस्य जर आजारी पडली तर त्याचा परिणाम संपूर्ण कुटूंबावर होतो. महिलांनी आरोग्यावर विशेष लक्ष दिले पाहिजे. तणावाच्या परिस्थिती पासून दूर रहायला पाहिजे. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक रश्मि नांदेडकर यांनी महिलांच्या दैनंदिनी कौटुंबिक बाबीवर मार्गदर्शन करून ज्या महिलांनी पोलीस तपासामध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. त्यांना शुभेच्छा दिल्या. पोलीस दलामध्ये ज्या महिला, कर्मचारी यांनी पोलीस तपासामध्ये उत्कृष्ट कामगिरी केली त्या महिला पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना पोलीस अधीक्षक विनीता साहू यांचे हस्ते प्रशस्तीपत्र देवून त्याचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान विविध पथनाट्य तसेच आर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला पोलीस उपनिरीक्षक लांजेवार, पोलीस स्टेशन शाखेतील तसेच पोलीस मुख्यालय येथील महिला पोलीस अधिकारी, कर्मचारी व त्यांचे कुटूंबातील महिला सदस्या मोठ्या संख्येत उपस्थित होते. संचालन स्मिता गालफाडे व आभार प्रदर्शन पोलीस उपअधीक्षक सुनिल कुलकर्णी यांनी केले.