शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
2
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
3
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
4
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
5
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
6
Latest Marathi News LIVE: होर्मुझ सामुद्रधुनीचा पेच, तणाव वाढला; ४० देशांची होणार बैठक, ब्रिटन-फ्रान्सने घेतला पुढाकार
7
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
8
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
9
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
10
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
11
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
12
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
13
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
14
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
15
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
16
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
17
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
18
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
19
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
20
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

महागाईविरोधात महिला काँग्रेसचा मोर्चा

By admin | Updated: June 23, 2016 00:28 IST

वाढत्या महागाईविरोधात सध्या सर्वसामान्यांची कंबर मोडली आहे.

भंडारा : वाढत्या महागाईविरोधात सध्या सर्वसामान्यांची कंबर मोडली आहे. त्याची झळ महिला वर्गाला अधिक बसत असल्याचा आरोप करत भंडारा जिल्हा महिला काँग्रेसने त्रिमूर्ती चौक भंडारा येथे महिलांनी ठिय्या आंदोलन करून घोषणाबाजी करत निदर्शने केली.महिला काँग्रेसच्या वतीने भंडारा जिल्हा परिषद चौकातून भाजपाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. विविध करदेखील वाढले आहेत. त्यामुळे जगायचे कसे, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. निवडणुकीआधी भाजपा सरकारने अनेक आश्वासने दिली. आज ही आश्वासने हवेतच विरली आहेत. त्यांनी दिलेल्या आश्वासनाची आठवण त्यांना करून द्यावी, त्यांना जाग आणावी म्हणूनच हा मोर्चा काढण्यात आल्याचे भंडारा जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सीमा भुरे यांनी स्पष्ट केले. भाज्या, फळभाज्या, तेल, डाळ, पेट्रोल, डिझेलचे भाव वाढतच असल्याने सर्वच स्तरावरील नागरिकांचे जगणे दुरापास्त झाल्याचे मत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केले. या मोर्चात मोठ्या प्रमाणात महिला सहभागी झालेल्या होत्या. परंतु भाजपा कार्यालयाकडे जात असताना पोलिसांनी हा मोर्चा वाटेतच अडविला. त्यामुळे त्रिमूर्ती चौकातच हा कार्यक्रम घेण्यात आला. सकाळ असो वा संध्याकाळ, जेवणातून गायब झाली डाळ, महागाई की मार भारी है, अब मोदी सरकार की जाने की बारी है. अशा घोषणा देण्यात आल्या. या मोर्चाचे नेतृत्व भंडारा जिल्हा काँग्रेस अध्यक्षा सीमा भुरे, भंडारा जिल्हा परिषद अध्यक्षा भाग्यश्री गिलोरकर, मोहाडीच्या नगराध्यक्षा स्वाती निमजे यांनी केले. यावेळी जि.प. सदस्य वंदना पंधरे, जि.प. सदस्य रेखा वासनिक, मंदा गणवीर, सुगंधा नंदागवळी, मंगला बगमार, सभापती पं.स. लाखांदूर, कल्पना जांभुळकर लाखनी, मीरा उरकुडकर पवनी, भारती लिमजे भंडारा, मोहिनी नंदनवार, ताराबाई नागपुरे, अस्मिता वाघमारे, निरंजना साठवणे, सीमा साठवणे, वंदना मेश्राम, गीता बोकडे, सुनीता सोरते, सीमा बावणे, शोभा करडे, अरुणा श्रीपाद, प्रीती बागडे, लीला पाथोडे, माला फुंडे व असंख्य महिला कार्यकर्ते उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)