शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

महिलांनी दुकानदाराला ३० हजारांनी गंडविले

By admin | Updated: April 16, 2017 00:18 IST

कुठलाही व्यवसाय म्हटले की, दुकानात येणाऱ्या ग्राहकांची गर्दी आलीचं. दुकानात येणारा ग्राहक हा दुकानदारासाठी एकप्रकारे देवच असतो.

अड्याळ येथील प्रकार : अंगातील पेटीकोटमध्ये लपवून नेल्या साड्याभंडारा : कुठलाही व्यवसाय म्हटले की, दुकानात येणाऱ्या ग्राहकांची गर्दी आलीचं. दुकानात येणारा ग्राहक हा दुकानदारासाठी एकप्रकारे देवच असतो. मात्र, कधीकधी असे ग्राहक दुकानदारांना आर्थिक नुकसान पोहचविणारे असतात. कापड दुकानात आलेल्या चार महिलांनी त्यांच्या अंगातील साडीखालील पेटीकोटमध्ये लपवून तब्बल ३० हजारांच्या साड्या चोरून नेल्या. ही घटना पवनी तालुक्यातील अड्याळ येथे एका कापड दुकानात घडला. गोपाल बंसीलाल टावडी (५७) अशोकनगर अड्याळ असे महिलांनी गंडविलेल्या कापड व्यावसायीकाचे नाव आहे. गुरूवारला ही घटना घडली असून अड्याळ पोलिसांनी या प्रकरणी चार अनोळखी महिलांविरूध्द गुन्हा नोंदविला आहे. गुरूवारला गोपाल टावडी हे दुकानात असताना दुपारी ४ वाजताच्या सुमारास ३५ ते ४० वर्ष वयोगटातील चार अनोळखी महिला दुकानात आल्या. महिला ग्राहक असल्याने दुकानदार टावडी यांनी त्यांचे आवभगत केले. यावेळी महिलांनी दुकानदारांना चांगल्या प्रतिच्या साड्या दाखविण्याची मागणी केली. महागड्या साड्या दाखवित असताना व दुकानदारांचे लक्ष नसल्याची संधीसाधून या महिलांनी त्यांनी परिधान केलेल्या साड्यांच्या खालील पेटीकोटमध्ये दुकानातील महागड्या साड्या लपविल्या. याची साधी कल्पनाही दुकानदार टावडी यांना आली नाही. महिला निघून गेल्यावर त्यांना दाखविलेल्या महागड्या साड्यांपैकी काही साड्या व बंगलोर स्लीप दिसून आल्या नाही. त्यामुळे ग्राहक म्हणून आलेल्या तोतया महिला ग्राहकांनी दुकानदाराला लुबाडल्याचे स्पष्ट झाले. यावरून गोपल टावडी यांनी अड्याळ पोलिसात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे. तपास सहायक फौजदार नंदेश्वर करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)