शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

By admin | Updated: May 28, 2016 00:30 IST

तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या एका ४० वर्षीय महिलेवर वाघाने हल्ला करुन ठार मारले. वाघाने हल्ला केला तेव्हा ती ...

नवरगाव जंगलातील घटना : महिलेचा शोध सुरुचपहेला : तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या एका ४० वर्षीय महिलेवर वाघाने हल्ला करुन ठार मारले. वाघाने हल्ला केला तेव्हा ती महिला जीवाच्या आकांताने अन्य महिलांना पळून जा, असे जोरजोराने ओरडत होती. सवर्णा कवडू गणवीर रा. नवरगाव असे या महिलेचे नाव असून वृत्त लिहीपर्यंत तिचा मृतदेह आढळला नव्हता. तिचे रक्ताने माखलेले कपडे नवरगाव जंगलातील घटनास्थळ परिसरात आढळले. ही घटना आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली.भंडारा तालुक्यातील पहेला परिसरातील नवरगाव, निमगाव यासह अन्य गावातील महिला तेंदुपत्ता संकलनासाठी गाव शेजारील जंगलात समुहाने जात असतात. नवरगाव येथील काही महिला तेंदुपत्ता तोडण्यासाठी जंगल शिवारात गेल्या होत्या. यात सवर्णा गणविर याचाही समावेश होता. सकाळी ९ वाजताच्या सुमारास जंगलात तेंदूपत्ता तोडीत असताना दबा धरुन बसलेल्या वाघाने सवर्णा यांच्यावर झडप घातली. जीवाच्या आकांताने सवर्णा ह्या ओरडू लागल्या. मात्र त्यातही त्यांना सोबतीच्या महिलांना ओरडून पळून जाण्याचे सांगिते. सोबतच्या महिलांनी पळ काढीत गावात येवून घटनेची माहिती दिली. घटनास्थळी ग्रामस्थांनी गर्दी केली. ज्या ठिकाणी सवर्णा गणवीर यांच्यावर वाघाने हल्ला केला त्या परिसरात रक्ताने माखलेले कपडे मिळाले. यावरुन सदर महिला जिवंत नसावी, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. घटनेची माहिती भंडारा वनविभाग व अड्याळ पोलीस ठाण्यात देण्यात आली. ग्रामस्थांसह वन विभागाचे कर्मचारी महिलेच्या शोध घेत आहे. सायंकाळी गणवीर यांचा शोध घेण्याचे कार्य सुरु होते. या घटनेने मात्र नवरगाव येथे शोककळा पसरली आहे. (वार्ताहर)