यावेळी गटविकास अधिकारी नूतन सावंत, तालुका व्यवस्थापक प्रिया सुखदेवे, कृषी अधिकारी विकास चौधरी, विस्तार अधिकारी शिल्पा निखाडे, एस.ए. वरगंटीवार, आर.डी. आंबोणे, धीरज गोस्वामी, आर.डी. काळबांडे, बी.के. बोदेले, एस एफ. भुजाडे, वाय.एम. केकडे, डॉ. एस आर. हजारे, नितीन साठवणे यांच्यासह तालुकास्तरीय समितीचे पदाधिकारी, ग्रामसंघाचे अधक्ष, सचिव, कॅडर, बीएमएमयू टीम, उमेदच्या संयोजिका तसेच अन्य महिला कर्मचारी उपस्थित होत्या. महिलांना मिळणारा रोजगार व त्यातून होणारे आर्थिक स्वावलंबन हे महिला सक्षमीकरणाचे एक महत्त्वाचे साधन आहे, असे गटविकास अधिकारी नूतन सावंत यांनी सांगितले. उमेदच्या तालुका व्यवस्थापक प्रिया सुखदेवे यांनी ग्रामीण भागात महिलांचा वाढत असलेला सहभाग यावर मार्गदर्शन केले. स्वतःचा संसार सांभाळून सामाजिक कार्यासाठी योगदान देणाऱ्या विविध महिला बचत गटांचा यावेळी सत्कार करण्यात आला. संचालन किरण बोकडे यांनी केले. प्रास्ताविक तालुका अभियान व्यवस्थापक प्रिया सुखदेवे यांनी तर आभार सीएलएम मंगला बोरकर यांनी मानले.
भंडाऱ्यात तालुकास्तरीय कार्यशाळेत महिलांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:34 IST