शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

दर घटूनही धानाची आवक वाढली

By admin | Updated: December 12, 2015 00:33 IST

धानाचे कोठार म्हणून राज्यात तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे.

मार्केट यार्ड हाऊसफुल्ल : ऊस, गुळाचे कोठार असले तरी शेतकरी संकटातमोहन भोयर तुमसरधानाचे कोठार म्हणून राज्यात तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे. मागील दोन महिन्यात या बाजारपेठेत १ लाख ४५ हजार क्विंटल धान विक्रीकरिता आले. धानाला भाव नसूनही शेतकऱ्यांना नाईलाजास्तव धान विक्री करावी लागत आहे. जवळच्या मध्यप्रदेशातूनही येथे धान विक्रीला आणले जाते, हे विशेष.१५ आॅक्टोंबर ते १० डिसेंबरपर्यंत तुमसर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डावर जय श्रीराम, एचएमटी तथा इतर धान १.४५ लाख क्विंटल विक्री करण्यात आली. जय श्रीराम धानाचा प्रति क्विंटल भाव २१५०, एचएमटीचा १८५० ते १९५० व १०१० धानाचा भाव १२०० ते १२५० इतका आहे. धानाची आवक बाजार समितीत वाढली. भंडारा जिल्ह्यात धानाची मोठी व एकमेव बाजारपेठ आहे. मध्यप्रदेशातील शेतकरीही येथे धान विक्रीला आणतात. येथे गुळाची मोठी बाजारपेठ असून ऊसाचे नगदी पीक येथील शेतकऱ्यांनी सुरु केले. पंरतु ऊसाला भाव मिळत नसल्याने व सिंचन सोयी नसल्याने शेतकऱ्यांनी त्याकडे पाठ फिरविली. यावर्षी धान पिकाची उतारी नाही. धान पिकाचा दर्जा घसरला आहे. उत्पादन कमी व खर्च वाढला त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. कर्ज काढून शेती केली तरीही खर्च निघाला नाही. बाजार समितीच्या मार्केट यार्डात एकाचवेळी आवक वाढल्याने धान ठेवायला जागा नाही. वजन काटा करण्याकरिता प्रतिक्षा करावी लागत आहे. संचालक मंडळाला मुदतवाढयेथील बाजार समितीच्या १९ सदस्यीय संचालक मंडळ दोनदा मुदतवाढ मिळाली आहे. दुसऱ्या मुदतवाढीचा कार्यकाळ डिसेंबरअखेरपर्यंत आहे. जिल्हा निबंधकांनी अद्ययावत मतदार याद्या मागितल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात बाजार समितीची निवडणूक होण्याचे संकेत आहेत. तत्पूर्वी येथे प्रशसकीय संचालक मंडळ नियुक्तीच्या हालचालींना वेग आला होता, परंतु त्यात यश आले नाही.आठ कोटींच्या निधीची प्रतीक्षा तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तुमसर बाजार समितीला भेट दिली होती. त्यावेळी बाजार समितीचा व्याप, कार्यक्षेत्र व समितीला होणारा नफा पाहून आठ कोटींचा निधी विविध विकास कामाकरिता देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर राज्यात सत्तांतर झाले, आणि निधी अडला.वेअर हाऊसची क्षमता कमीधानाची आवक वाढली, पंरतु बाजार समितीच्या वेअर हाऊसची क्षमता एक हजार मेट्रीक टनाची आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा माल बऱ्याचदा उघड्यावरच ठेवावा लागतो. येथे शेतकऱ्यांकरिता शेतमाल तारण योजना राबविण्यात येते. धान्य सुरक्षतेकरिता सीसीटीव्ही कॅमेऱ्याची करडी नजर आहे.