शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

पवनीतील खड्डेमय रस्ते रहदारीस अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 05:00 IST

पावसाळ्यात रस्ते खड्डेमय असले की खड्ड्याच्या अंदाज न समजल्यास अपघाताची शक्यता असते, खड्डेमय रस्त्यामुळे नगरात सायकल-मोटारसायकलचे किरकोळ अपघात देखील झाले आहेत. प्रामुख्याने ताडेश्वर वॉर्ड, बेलघाटा-बस्तरवारी वॉर्ड, गांधी चौक व जवाहर गेट समोरील परिसर  याठिकाणी रस्ते अतिशय जास्त खड्डेमय झालेले आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : नगर परिषद क्षेत्रात पाणी पुरवठा योजनेअंतर्गत पाईपलाईनचे काम करण्यात आले. पाईपलाईन टाकून झाल्यानंतर रस्ते दुरुस्ती अपेक्षित होती, पण कंत्राटदार व नगर परिषद प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे नगरातील अपवाद वगळता सर्वच रस्ते रहदारीस अडथळा निर्माण करीत आहेत. पावसाळ्यात रस्ते खड्डेमय असले की खड्ड्याच्या अंदाज न समजल्यास अपघाताची शक्यता असते, खड्डेमय रस्त्यामुळे नगरात सायकल-मोटारसायकलचे किरकोळ अपघात देखील झाले आहेत. प्रामुख्याने ताडेश्वर वॉर्ड, बेलघाटा-बस्तरवारी वॉर्ड, गांधी चौक व जवाहर गेट समोरील परिसर  याठिकाणी रस्ते अतिशय जास्त खड्डेमय झालेले आहेत. नगरातील बहुतेक रस्ते अरुंद, त्यात रस्त्याचे दुतर्फा दुकानांचे बोर्ड, बँका व दुकानासमोर पार्किंग केलेल्या मोटारसायकलींची गर्दी आणि पाईपलाईन टाकण्यासाठी खोदून नादुरुस्त करण्यात आलेले रस्ते सर्वच त्रासदायक असूनही पालिका प्रशासन, पदाधिकारी व नगरसेवक यांना लोकहिताची जाणीव नाही त्यामुळे पवनीकरांना त्रास सहन करावा लागत आहे. गरज नसताना लोकवस्तीबाहेर सिमेंट काँक्रीटचे रस्ते बांधकाम करण्यात आले पण नगरातील रस्ते दुरुस्ती करण्यात येत नाहीत. पालिका प्रशासनाविरुद्ध नगरवासीय रोष व्यक्त करीत आहेत. पण प्रभार असलेले मुख्याधिकारी व पदाधिकारी दखल घेत नसल्याने नगरवासीयांत असंतोष निर्माण झाला आहे. नगर परिषद प्रशासनाने रस्ते दुरुस्तीची मोहीम सुरू करून रहदारीतील अडथळा दूर करावा व अपघात टाळावेत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

 

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक