शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

नदीलगत गावात बांधले वन जलसाठवण तलाव

By admin | Updated: July 9, 2016 00:29 IST

वन्यप्राण्यांना पिण्याकरिता पाणी उपलब्ध करून देणे व वनातील जलस्तर वाढविण्याकरिता तुमसर वनपरिक्षेत्रात नऊ वन जलसाठवण तलाव तयार करण्यात आले.

तुमसर वनपरिक्षेत्रातील प्रकार : एकाच गावात दोन तलावमोहन भोयर  तुमसर वन्यप्राण्यांना पिण्याकरिता पाणी उपलब्ध करून देणे व वनातील जलस्तर वाढविण्याकरिता तुमसर वनपरिक्षेत्रात नऊ वन जलसाठवण तलाव तयार करण्यात आले. यात नदीजवळील दोन गावात चार वन जलसाठवण तलावांचा समावेश आहे. गावाजवळ तलाव असल्याने वन्यप्राण्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. ही गावे जलयुक्त शिवार योजनेत कशी समाविष्ट झाली आ प्रश्न उपस्थित होत आहे.सन २०१५-१६ या वर्षात पहिल्या टप्प्यात तुमसर वनपरक्षिेत्राअंतर्गत करडी १, मोहगाव १, देव्हाडा येथे दोन वनसाठवण तलाव तयार करण्यात आले. एका तलावाकरिता २ लक्ष ९४ हजारांचा निधी मंजूर करण्यात आला. चार तलावांकरिता ११ लक्ष ७६ हजार खर्च करण्यात आले. दुसऱ्या टप्प्यात येरली १, मेहगाव १, दावेझरी १ व नरसिंगटोला २ असे पाच तलाव तयार करण्यात आले. याकरिता नऊ लाख खर्च करण्यात आले. ३० बाय ३० चे हे वन जलसाठवण तलाव आहेत. पहिल्या टप्प्यातील तलावाकरिता २ लक्ष ९४ हजार तर दुसऱ्या टप्प्यातील तलावाकरिता १ लाख ८० हजारांचा निधी देण्यात आला. जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी दुसऱ्या टप्प्यातील वनसाठवन तलावांचा निधी कमी केला. वनसाठवण तलावाची माती दूरवर घातली तर जास्त निधी व जवळ घातली तर कमी निधी मंजूर केली. पुन्हा सन २०१६-१७ मध्ये या वनपरिक्षेत्रात वन जलसाठवण तलाव तयार करण्यात येणार आहे.येथे देव्हाडा २ व नगरसिंहटोला येथे २ वन जलसाठवण तलाव तयार करण्यात आले. ही दोन्ही गावे वैनगंगा नदीपासून अवघ्या एक ते दीड कि़मी. अंतरावर आहेत. या गावांचा जलस्तर निश्चितच जास्त आहे. येथे दोन्ही गावात दोन दोन वन जलसाठवण तलावांना मंजुरी कशी देण्यात आली, हा संशोधनाचा विषय आहे.वनसाठवण तलाव गाव शिवारात आहेत. गावाजवळ वन्यप्राणी पाणी पिण्याकरिता येतील. बारमाही वैनगंगा नदी वाहते. ३० बाय ३० चे तलाव या वन्यप्राण्यांना दिसणार आहेत काय, गावाजवळ वन्यप्राण्यांना धोका होण्याची शक्यता आहे. गावाचे जलस्तर वाढविण्यासाठी हे तलाव सक्षम आहेत काय, हा प्रश्न असून येथे संबंधितांचे आर्थिकस्तर वाढविण्याचा प्रकार दिसून येतो. वनविभागाने या कामांना मंजूरी कशी दिली हा मुख्य प्रश्न आहे. तुमसर वनपरिक्षेत्रात एकूण नऊ वन जलसाठवण तलाव तयार करण्यात आले. यासर्व वन जल साठवण तलाव असलेली गावे शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेत समाविष्ट आहेत. म्हणून तिथे वन जलसाठवण तलाव बांधण्यात आले.- अरविंद जोशी, वनपरिक्षेत्र अधिकारी, तुमसर.