तुमसर : सोनकुंड ते सोनेगाव दरम्यान बेपत्ता चारचाकी वाहनाचा बुधवारी वनविभागाच्या १० ते १५ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोका अभयारण्यातील परिसर पिंजून काढला. जंगलातील अंतर्गत रस्त्यांचा त्यात समावेश आहे. जंगलातील अंतर्गत रस्त्यावर बांबू व इतर लाकडांचे अडथडे लावली आहेत. जंगलात पायदळ संचार त्या दोघांनी केला. या दिशेने तपास सुरू आहे.गुजरात राज्याची परवानाधारक वाहन क्रमांक जीजे-६/बीए-९१३५ मंगळवारी दुपारी ३.३० च्या सुमारास कोका अभयारण्यातील सोनकुंड गेटक्रमांक एकवर साकोलीकडे जाण्याकरिता नोंदणी केली. व्यापारी असून साकोली येथे व्यवसायाकरीता जात असल्याची नोंद त्या दोघांनी केली. सोनकुंड नंतर वाहन पुढील प्रणायाकरीता निघाले. सोनेगाव कडून एसीएफ गायकवाड सोनकुंडकडे जात असतानी त्यांनाही चारचाकी अगदी हळू जातानी दिसली. गायकवाड यांना शंका आल्यावर यांनी सोनेगाव येथे भ्रमणध्वनीवर संपर्क साधून वाहनाची कसून तपासणी करण्याचा आदेश गेट क्रमांक दोन वरील कर्मचाऱ्यांना दिला. सोनेगाव येथे वाहन आलेच नाही, अशी माहिती सोनेगाव गेटवरील कर्मचाऱ्यांनी एसीएफ गायकवाड यांना दिली. यामुळे गायकवाड यांनी सोनकुंडसह इतर वनाधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवर सतर्क केले. काही तासाने ही गाडी परत सोनकुंड गेट क्रमांक एकवर आली. वनकर्मचाऱ्यांनी तिची कसून तपासणी केली. वाहनात आक्षेपार्ह काहीच नव्हते. कर्मचाऱ्यांनी पुन्हा परत कां आले असा प्रश्न केल्यावर आम्ही तुमसर येथे जाण्याचे ठरविले असे सांगितले. व्यवसायातील कामात बदल करावे लागतात, असे उत्तर त्यांनी दिले. सोनकुंड ते सोनेगाव हे अंतर १२ ते १५ कि़मी. आहे. अभयारण्यातील अंतर्गत रस्ते मार्गाने ते वाहन गेले काय, याचा तपास सध्या वनविभाग घेत आहे. सध्या अभयारण्यात प्रवेश बंद असून अंतर्गत रस्त्यावर बांबू व लाकडांनी रस्ते बंद करण्यात आले आहे. त्यामुळे हे वाहन रस्त्याने जाऊ शकत नाही. सोनकुंड ते सोनेगाव दरम्यान सर्व अंतर्गत रस्त्यांची व जंगलाची कसून पाहणी व तपासणी राऊंड आॅफिसर मारबते, पाच गार्ड व १० ते १२ वनमजुरांनी आज दिवसभर केली, परंतु त्या पथकाला काही विशेष आढळले नाही. (तालुका प्रतिनिधी)
वनाधिकाऱ्यांनी पिंजून काढले जंगल
By admin | Updated: July 30, 2014 23:51 IST