शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

कुणी फेकले टमरेल तर कुणी ठोकली धूम

By admin | Updated: February 22, 2017 00:30 IST

शौचालय नसल्याने उघड्यावर जाणाऱ्यांसोबतच घरी शौचालय असल्यानंतरही उघड्यावर जाणाऱ्यांची संख्या कमी नाही. मात्र उघड्यावर शौचास जाणाऱ्यांची कशी फजिती होते, ...

उघड्यावर शौचास बसणाऱ्यांची शेतशिवारात पळापळ : तुमसर तालुक्यातील येरली येथे ग्रामस्थांची तारांबळभंडारा : शौचालय नसल्याने उघड्यावर जाणाऱ्यांसोबतच घरी शौचालय असल्यानंतरही उघड्यावर जाणाऱ्यांची संख्या कमी नाही. मात्र उघड्यावर शौचास जाणाऱ्यांची कशी फजिती होते, ती तुमसर तालुक्यातील येरली येथील ग्रामस्थांना विचारल्यास ते शब्दात सांगू शकणारे नाही. ‘गुडमॉर्निंग पथक’ाच्या कारवाईच्या धास्तीने मंगळवारला येरलीतील उघड्यावर जाणाऱ्यांची तारांबळ उडाली. कारवाईच्या भीतीने कुणी पाणी भरलेले टमरेल फेकले तर काहींनी आहे त्या परिस्थितीत शेतशिवारातून घराकडे धूम ठोकली. जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या गुडमॉर्निंग पथकाने मंगळवारला येरली गावात बस्तान मांडले. त्यांच्यासोबत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना बघून येरलीवासीयांची चांगलीच तारांबळ उडाली. एखाद्या चित्रपटातील प्रसंगाला शोभावा असाच कल्पना न केलेला प्रसंग प्रत्यक्षात भल्या पहाटेपासूनच येरलीत घडला. मागील काही दिवसांपासून स्वच्छता मिशन पथकाने ‘ओडीएफ’ अंतर्गत जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी गावस्तरावर शौचालय बांधकामावर भर दिला आहे. त्यांच्या पुढाकाराने अनेक गावे आता हागणदारीमुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत आहेत. तरीही मात्र काही गावे याला अपवाद ठरलेली आहेत. तुमसर तालुक्यात मागील १५ दिवसांपासून या पथकाने भल्या पहाटेच गाव गाठून गावाच्या वेशीवर पाळत ठेवून उघड्यावर जाणाऱ्यांना गुलाब फुल देऊन शौचालय बांधण्याचे मार्गदर्शन करीत आहेत. या पथकाच्या मार्गदर्शन व कारवाईच्या धास्तीने अनेकांनी शौचालयाचे बांधकाम सुरू केले असून काहींचे बांधकाम पूर्ण झाल्याचे चित्र बघायला मिळत आहे. गुडमॉर्निंग पथकाच्या पुढकाराने गाव विकासाच्या वाटेत एक पाऊल पुढे जात असल्याचे हे आदर्श उदाहरण म्हणावे लागेल.येरली येथे गुडमॉर्निंग पथकाने पहाटेच धडक दिली. यावेळी त्यांनी दोन पथक गावाच्या वेगवेगळ्या दिशेने पाठविले. येथील अनेकांनी सूर्योदय होताच हातात ‘तांब्या’ घेऊन गावालगतच्या तलावांच्या दिशेने प्रात:विधी आटोपण्यासाठी मोर्चा वळविला. हे दृष्य बघताच गुडमॉर्निंग पथक त्यांच्यासमोर उभे ठाकले. या पथकाला बघून अनेकांच्या बोबड्या वळल्या. काहींनी पाणी भरलेले टमरेल फेकले तर अनेकांनी मिळेल त्या दिशेने धूम ठोकली. शेतशिवारातून मार्ग काढताना अनेकांची चांगलीच फटफजिती झाली. हे दृष्य बघताना अनेकांना हसू आवरता आले नाही. ज्यांना पळता आले नाही ते पथकासमोर निरूत्तरीत होऊन उभे झाले. अशा ‘लोटेधाऱ्यांना’ पथकाने गुलाबाचे फुल दिले. त्यांना शौचालय बांधण्याचे मार्गदर्शन करून गावाला समृद्धीच्या दिशेने नेण्याच्या दिशेने व हागणदारीमुक्त गाव म्हणून ओळख निर्माण करण्याच्या दृष्टीने सहकार्य करण्याचे आवाहन केले. या धडक कारवाईनंतर अनेकांनी उघड्यावर शौचासाठी जाणार नसल्याचे पथकाला सांगून सुटका करवून घेतली. (शहर प्रतिनिधी)वऱ्हाडीही अडकले ‘लोट्यात’येरली येथे एका कुटुंबाकडे विवाहाचा कार्यक्रम असल्याने त्यांच्याकडे पाहुण्यांची रेलचेल होती. यातील अनेकांकडे शौचालय असले तरी वऱ्हाडी म्हणून ते विवाह घरी आले होते. या घरी शौचालयाची व्यवस्था अपुरी असल्याने अनेकांनी ‘लोटा’ पकडून बाहेर जाणे पसंत केले. मात्र गुडमॉर्निंग पथकाची कारवाई सुरु असल्याची कल्पना नसल्याने हे वऱ्हाडीही यात अडकले. या पथकाने मंगळवारला येरली येथील ३० ते ३५ लोटे जप्त करून ग्रामपंचायत कार्यालयासमोर टांगून ठेवले.शौचालय बांधण्याचा अनेकांनी केला निर्धारभविष्यात अशीच परिस्थिती प्रत्येकांवर ओढवेल त्यामुळे पथकाच्या कारवाईच्या धास्तीने अनेक गावांमध्ये आता शौचालय बांधकामाचे वातावरण निर्मिती आपसुकच होऊ लागली आहे. ज्यांच्याकडे शौचालय आहे अशांनी आता शौचालयात जाण्याचा तर ज्यांच्याकडे नाही त्यांनी शौचालय बांधण्याचा निर्धार केला आहे.