शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

पवनीत नळ योजनेच्या पाईपलाईनचे काम केव्हा होणार

By admin | Updated: June 10, 2017 00:19 IST

पवनीकरांना समप्रमाणात पाणी पुरवठा होत नाही तो दूर करण्यासाठी पालिका प्रशासनाने प्रेशर पाईपलाईनची योजना आखली.

नागरिक त्रस्त : प्रेशर पाईपलाईन योजना थंडबस्त्यातलोकमत न्यूज नेटवर्कपवनी : पवनीकरांना समप्रमाणात पाणी पुरवठा होत नाही तो दूर करण्यासाठी पालिका प्रशासनाने प्रेशर पाईपलाईनची योजना आखली. कोट्यवधी रूपयाचे प्रेशर पाईपलाईनचे काम नगरातील प्रत्येक रस्त्यावर सुरू आहे. प्रेशर चेक करण्यासाठी पाईपलाईन मधून पाणी सोडण्यात आले आणि नागरिकांना दहा दिवसापासून पाण्यासाठी त्रस्त व्हावे लागत आहे. नळाद्वारे थेंब थेंब पाणी येत असल्याने कित्येक वॉर्डात नागरिकांची ओरड सुरू आहे.एक ते दीड महिन्यापासून नगरात प्रेशर पाईप लाईनचे काम सुरू आहे. सिमेंट काँक्रीटचे रस्ते ड्रीलींग मशीनद्वारे खोदूर पाईपलाईन टाकणे सुरू आहे. काही रस्त्यावर पाईपलाईनचे काम झालेले आहे. पाईपलाईनचे झालेले काम असताना रस्ते समतल करण्यात आलेले नाही त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झालेला आहे. नगराध्यक्षासह सर्व नगरसेवक नवशिखे असल्याने कंत्राटदारावर पदाधिकारी व अधिकारी यांचे नियंत्रण नाही. त्यामुळे वाटेल त्या पद्धतीचे काम सुरू आहे. काही ठिकाणी पाईपलाईनमध्ये नालीचे पाणी सुद्धा गेलेले आहे तसेच पाईप कापल्याने निघणारा किससुद्धा पाईपलाईनमध्ये गेलेला आहे. प्रेशर चेक करण्यासाठी प्रेशर पाईपमध्ये पाणी सोडले असता त्या दिवशी नळधारकांना भरपूर पाणी मिळाले व त्या प्रेशरमुळे पाईपचा किस नळधारकांच्या पाईपमध्ये गेल्याने दुसऱ्या दिवसीपासून थेंब थेंब पाणी नळाद्वारे मिळत आहे. नेताजी वॉर्ड व नंदरधने ले-आऊट या भागात ही समस्या गंभीर आहे. नळधारकांना त्रास होवू नये त्यांना नियमित व पुरसा पाणी मिळावे यासाठी पालिका प्रशासनाने प्रेशर पाईप लाईनच्या कामावर काटेकोरपणे देखरेख ठेवावी, अशी नागरिकांची मागणी आहे.