शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

केव्हा घटणार वाहतूक शुल्क?

By admin | Updated: January 24, 2015 22:49 IST

डिझेल आणि पेट्रोलच्या दरात पुन्हा एकदा घट झाली असली तरी सर्वसामान्यांना त्याचा फायदा होण्याची शक्यता मात्र दिसत नाही. शाळा व महाविद्यालयांनी पुर्वीचे वाहतूक दर कायम ठेवले आहे.

भंडारा : डिझेल आणि पेट्रोलच्या दरात पुन्हा एकदा घट झाली असली तरी सर्वसामान्यांना त्याचा फायदा होण्याची शक्यता मात्र दिसत नाही. शाळा व महाविद्यालयांनी पुर्वीचे वाहतूक दर कायम ठेवले आहे. २०१४-१५ हे शैक्षणिक वर्ष संपायला आता तीन महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. तोपर्यंत वेळ मारून देण्याचा प्रयत्न बहुतांश शिक्षक संस्था करीत असल्याच्या पालकांच्या तक्रारी आहेत. खासगी ट्रॉयव्हल्स एजन्सीकडूनही इंधन दर वाढीकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने प्रवाशांना भुर्दंड सहन करावा लागत आहे. यापूर्वी नोव्हेंबर महिन्यात पेट्रोल व डिझेलचे दर कमी करण्यात आले होते. डिझेलचे दर घटले. वाहतूकही मात्र जैसे थे या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करून लोकमतने विद्यार्थी वाहतूक प्रश्नाला वाचा फोडली होती. आता पेट्रोल व डिझेलच्या प्रति लिटर दरात अनुक्रमे २.४२ आणि २.२५ रूपयांची कपात करण्यात आली आहे. तरीदेखील विद्यार्थी वाहतुकीचे दर कामय आहेत. एरवी पेट्रोल व डिझेलच्या दरात किरकोळ वाढ होताच महागाईचा भडका उडत असतो. मुलांच्या असलेल्या बसेस, रिक्षा, एस.टी., मिनीबस वाहतुकीत दर वाढ होते. याचाच अर्थ डिझेलचे दर घटताच रेल्वेभाडेही कमी होणार आहे. सद्यस्थितीत डिझेलच्या भावात घट झाली असताना बसची भाडेवाढ कमी होणे अपेक्षित होते. परंतु असे होताना दिसत नाही. परवानगी जाणाऱ्या ट्रॅव्हल्सनी आपले दर कमी केले नाही. शिक्षणाचा टक्का वाढविण्यासाठी शासनातर्फे शाळांना अनुदान तसेच इतर सवलती दिल्या जातात. विद्यार्थ्यांची वाहतुक करणाऱ्या शालेय बसच्या करातही सवलत दिली जाते. परंतु शाळा मात्र भाववाढ कमी करण्यास तयार नसल्याचेच दिसते. (नगर प्रतिनिधी)