शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
4
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
5
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
6
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
7
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
8
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
9
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
10
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
11
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
12
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
13
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
14
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
15
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
16
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
17
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
18
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
19
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
20
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार ?

By admin | Updated: January 9, 2017 00:30 IST

शासनाने सम्यक विचार करुन भंडारा जिल्ह्यातील लाखनी, साकोली, पवनी, लाखांदूर, भंडारा, तुमसर व मोहाडी तालुक्यातील २०१५ या वर्षातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने...

बीआरएसपीचा प्रश्न : शासन प्रशासन सुस्त, शेतकरी त्रस्तभंडारा : शासनाने सम्यक विचार करुन भंडारा जिल्ह्यातील लाखनी, साकोली, पवनी, लाखांदूर, भंडारा, तुमसर व मोहाडी तालुक्यातील २०१५ या वर्षातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची गरज असताना भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकरी बांधवाना आर्थिक मदत न देण्याचे कारण काय, असा प्रश्न बहुजन रिपब्लिकन सोशालीस्ट पार्टीचे जेष्ठ नेते संजय गाढवे, जिल्हा अध्यक्ष झेड. आर. दुधकुवर, उपाध्यक्ष मनोज गोस्वामी, अनिल भोवते यांनी उपस्थित केला आहे.भंडारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यात मोठ्या प्रमाणात धान (भात) पिकाचे उत्पादन घेण्यात येते. भंडारा जिल्ह्यातील शेती कोरडवाहू शेती असून निसर्गाचा पावसावर अवलंबुन आहे. शेतात धान (भात) पिकाची रोवणी केल्यापासुन तर पिक परिपक्व होऊन कापणीपर्यंत धान पिकाची सतत काळजी घ्यावी लागते. यासाठी शेतकऱ्यांंना मोठ्या प्रमाणात आर्थिक खर्च करावा लागत असतो. पंरतु दुसरा कोणताही पर्यायी पुरक व्यवसाय नसल्याने भंडारा जिल्ह्यातील लाखनी, साकोली, पवनी, लाखांदूर, भंडारा, तुमसर व मोहाडी तालुक्यातील शेतकरी बांधवाना सर्वस्वी शेतीवरच अवलंबुन राहावे लागते. अशातच खरीप हंगाम २०१५ मध्ये निसर्गाच्या अवकृपेमुळे व भात पिक तसेच रब्बी हंगामातील पिकांवर विपरित परिणाम होवुन पिक उत्पादनात बरीच घट आल्याने शेतकरी बांधवांना आर्थिक फटका सहन करावा लागला. अशावेळी शासनाने शेतकरी बांधवाना तातडीने आर्थिक मदत करणे गरजेचे असतांना अजुनपर्यंत आर्थिक मदत मिळाली नाही. तसेच पिक विमा योजनेचा लाभ मिळाला नाही, अशी शेतकरी बांधवांची ओरड आहे. अस्मानी व सुलतानी संकटामुळे धान उत्पादक शेतकरीबांधव कमालीचे आर्थिक विंवचनेत सापडले आहेत. (नगर प्रतिनिधी)