शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

नगर परिषद अभ्यासिका, वाचनालय केव्हा सुरू करणार?

By admin | Updated: June 8, 2017 00:25 IST

नगरपरिषद क्षेत्रात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांची संख्या वाढला आहे. विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास करण्यासाठी अभ्यासिका व वाचनालय यांचे खूप मोठे महत्व आहे.

निवेदन : सुशिक्षित बेरोजगारांची मागणीलोकमत न्यूज नेटवर्कपवनी : नगरपरिषद क्षेत्रात स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांची संख्या वाढला आहे. विद्यार्थ्यांचा बौद्धिक विकास करण्यासाठी अभ्यासिका व वाचनालय यांचे खूप मोठे महत्व आहे. मंदिराकडे जाणाऱ्या रांगा जेव्हा अभ्यासिकेकडे वळतील तेव्हा भारत हे एक महासत्ता होईल. या बाबासाहेब आंबेडकर यांचा उक्तीला पुर्णत्वास नेण्यासाठी नगर परिषद क्षेत्रामध्ये अभ्यासिका व वाचनालय याची आवश्यकता आहे. पालिकेने ते सुरू करावे, अशी मागणी आझाद शेतकरी संघटनेने मुख्याधिकारी यांना निवेदनातून केली आहे.शासकीय, निमशासकीय नोकरी मिळविण्यासाठी व बेरोजगारी कमी होवून एक आदर्श जीवन जगण्यासाठी स्पर्धा परीक्षा द्यावी लागते. मुळात सध्याचे युग हे स्पर्धेचे असल्यामुळे बौद्धिक पातळी वाढविण्यासाठी अभ्यासिका एक महत्वाचे साधन आहे.शासनातर्फे मोठ्या प्रमाणात संघ लोक सेवा आयोग, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, कर्मचारी चयन आयोग, आयबीपीएस, बँकिंग, रेल्वेभरती, आॅर्डनस फॅक्टरी, सिमा सुरक्षा दल, राज्य राखीव पोलीस दल, केंद्रीय राखीव पोलीस दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, पोलीस भरती, तलाठी भरती, ग्रामसेवक यासारख्या अनेक स्पर्धा परीक्षा घेण्यात येत असतात. त्यामुळे या परीक्षा देवून नौकरी मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांना अभ्यासाची आवश्यकता असते.पवनी नगर परिषद क्षेत्रात योग्य वाचनालय व अभ्यासिका उपलब्ध नसल्यामुळे आजच्या युवक वर्गाला नौकरी मिळवून भवितव्य घडविण्यात खूप मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या समस्यांना तोंड देण्यासाठी व स्वत:चे भवितव्य घडविण्यासाठी अभ्यासिका व वाचनालयाचा मोठा सहभाग असतो. पवनी नगर परिषद क्षेत्राचा विकास व्हावा आणि याचा आदर्श ठेवून भावी पिढी घडावी म्हणून नगर परिषद पवनीतर्फे अभ्यासिका व वाचनालय उपलब्ध करून द्यावे. अशा आशयाचे निवेदन आझाद शेतकरी संघटनेच्या वतीने मुख्याधिकारी माधुरी मडावी यांना देण्यात आले.निवेदनाचा विचार करून पवनी शहराचा तसेच जिल्ह्यात पवनी नगर परिषदेचा नाव उंच करून नवीन अभ्यासक पिढी तयार करण्यात हातभार लावत पवनी नगर परिषद क्षेत्रात वाचनालय व पुर्णवेळ अभ्यासिका उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आझाद शेतकरी संघटनेचे अध्यक्ष किशोर पंचभाई व सुशिक्षित बेरोजगार युवक निलेश, चंद्रकांत काटेखाये, अश्विन रामटेके आदींनी निवेदनातून केली आहे.