शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
6
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
7
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
8
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
9
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
10
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
11
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
12
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

कमकासूरवासीयांची घर वापसी कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 21:58 IST

राहुल भुतांगे ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : पुनर्वसन गाव रामपुर येथे मुलभूत सोयींच्या अभावामुळे आदिवासी यांनी ५ आॅक्टोंबर रोजी पुनर्वसित गाव सोडून त्यांच्या मुळ गावी कमकासुरात परतले. तिथे भयावह जंगल झुडपे, खितपत असलेल्या चिखलातच तंबू ठोकून संसार मांडला असताना थंडीचा कडाकाही वाढला आहे. परिणामी आदिवासी यांना मरणयातना भोगत असताना बोचºया थंडीत ...

ठळक मुद्देबोचºया थंडीत आदिवासी भोगतायेत मरणयातना : गावाला भेट देण्यासाठी पदाधिकारी अधिकाºयांकडे वेळ नाही

राहुल भुतांगे ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : पुनर्वसन गाव रामपुर येथे मुलभूत सोयींच्या अभावामुळे आदिवासी यांनी ५ आॅक्टोंबर रोजी पुनर्वसित गाव सोडून त्यांच्या मुळ गावी कमकासुरात परतले. तिथे भयावह जंगल झुडपे, खितपत असलेल्या चिखलातच तंबू ठोकून संसार मांडला असताना थंडीचा कडाकाही वाढला आहे. परिणामी आदिवासी यांना मरणयातना भोगत असताना बोचºया थंडीत जीवन जगने असह्य झाले आहे.आदिवासी यांनी पुनर्वसित गाव सोडून आज २५ दिवसांचा कालावधी लोटला परंतू अजुनपर्यंत त्यांच्या समस्यावर तोडगाच निघाला नसल्याने कमकासुर वासियांची घर वापसी कधी होणार, हे प्रश्न अजुनही अनुत्तरीयच आहे.महत्वाकांशी बावनथडी सिंचन प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रात येणाºया कमकासुर येथील आदिवासी यांना बंदुकी धाकावर गावातून हाकलन लावण्यात आले होते. त्यांचे पुनर्वसन रामपुर येथे करण्यात आले. मात्र गेल्या पाच वर्षापासून पुनवर्सित गावात १८ नागरी सुविधा, मुलभूत सुविधांचा तिथे वनवा होता. अनेकदा मागणी, निवेदन देवूनही समस्या सुटल्या नाहीत. परिणामी आदिवासींनी पुनर्वसन गाव सोडून मुळ गावी परतले. कमकासुर हे बुडीत गाव असल्याने त्या ठिकाणी झुडपे तयार होवून दलदल निर्माण झाले आहे.चहुबाजूने घनदाट जंगल असून त्याठिकाणी हिंस्त्र प्राण्यांचा वावर आहे. एकंदरीत तिथे मानवी वस्ती होवू शकत नाही. अशाही परिस्थितीत कमकासूर येथील आदिवासी बांधवांनी त्या ठिकाणी तंबू उभारून संसार थाटला आहे. मानवाला मिळणाºया मुलभूत सोयी अभावी तिथे मरण्यापेक्षा स्वगावी मरणे पसंद करू, आधी सोयी सुविधा पुरवा नंतरच आमची घर वापसी होणार, अशी तटस्थ भूमिका आदिवासीयांनी घेतली आहे.आदिवासी कसे जीवन जगतात की मरतात याकडे कुणाचेही लक्ष नाही. त्यामुळे आतापर्यंत त्यांची साधी विचारपूस करण्याकरिता एकही आमदार, खासदार तसेच जिल्हाधिकाºयांनीही ढूंकून पाहिले नाही.केवळ आश्वासनाची खैरात वाटत आमच्याकडे वेळ नाही असे सांगितल्याने आदिवासी यात शासन प्रशासना विरोधात रोष आहे. एकीकडे तालुक्यात आरोग्य महाशिबिराचे आयोजन होत असताना दुसरीकडे कमकासुरातील आदीवासी बांधवांना भेट द्यायला मंत्री तथा अधिकाºयांना वेळ मिळणार काय. असा सवालही प्रकल्पग्रस्त विचारीत आहेत. शासन व प्रशासनाच्या संवेदनाच हरविल्याचे जाणवत आहे.कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी मोठ मोठे नेते तुमसरात येत आहेत. तिथून जर थोडा सामोर आले व आम्हाला दिलासा दिला तर आमचे कुटूंब मरण यातनेच्या कचाट्यातून बाहेर पडतील. परंतू काही स्वार्थसाधू नेत्यामुळे ते होणे शक्य दिसत नाही.-किशार उईके, सरपंच कमकासूर.