शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

कृषी संजीवनी योजना बंद होण्याच्या मार्गावर

By admin | Updated: November 22, 2014 00:12 IST

महावितरणतर्फे राबविण्यात आलेली कृषी संजिवनी योजनेची मुदतवाढ संपल्यामुळे शेतकऱ्यांचा सहभाग होण्यापूर्वीच ही योजना बंद करण्यात आली आहे.

चुल्हाड (सिहोरा) : महावितरणतर्फे राबविण्यात आलेली कृषी संजिवनी योजनेची मुदतवाढ संपल्यामुळे शेतकऱ्यांचा सहभाग होण्यापूर्वीच ही योजना बंद करण्यात आली आहे. यामुळे तुमसर तालुक्यातील सिहोरा परिसरातील शेतकऱ्यांची धाकधुकी वाढलेली आहे. कृषी पंपधारक शेतकऱ्यांकडे वीज वितरण कंपनीचे कोट्यवधी रूपयांचे विज बिल थकीत आहेत. सततच्या नापिकीमुळे शेतकरी विज बिलाची देयक देत नाहीत. याशिवाय १४ तासाचे भारनियमन असल्यामुळे शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. परिणामी वीज वितरण कंपनीविरुद्ध संतप्त भावना व्यक्त होत आहे. शेतकऱ्याकडची वाढती थकबाकी वीज वितरण कंपनीसाठी डोकेदुखी ठरणारी आहे. विजेच्या थकबाकीची वसुली करण्यासाठी राज्यात कृषी संजिवनी योजनेची सुरूवात करण्यात आली आहे. वातानुकुलित खोलीत बसून या योनजेचा कृती आराखडा तयार करण्यात आलेला आहे. नियोजनकर्त्यांनी शेतकऱ्यांच्या शेतीचा आणि धानपिकांचा पंचनामा केलेला नाही. त्यामुळे या योजनेची मुदतवाढ संपली असतानाही शेतकऱ्यांनी सहभाग घेतला नाही. या योजनेत थकबाकीदार शेतकऱ्यांना विज बिलात ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. यामुळे ही योजना शेतकऱ्यांना संजिवणी ठरणारी आहे. या योजनेची सुरूवात आॅगस्ट महिन्यात करण्यात आली असून शेतकऱ्यांना विज बिलाचे देयक तथा सहभागासाठी वारंवार मुदतवाढ देण्यात आली आहे. ३१ आॅक्टोंबरला योजनेची अंतिम मुदतवाढ संपली असतानाही १ टक्के शेतकऱ्यांनी सहभाग घेतला होता. या योजनते शेतकऱ्यांनी अल्प प्रतिसाद नोंदविला असून विज बिलाची देयके दिलेले नाही, या कारणावरून रब्बी हंगामात कृषी पंपांचा विज पुरवठा खंडीत केला जाणार आहे. उन्हाळी धान पिकाला पाण्याची गरज असते. हीच संधी साधून कृषी संजिवनी योजना बंद करण्यात आली आहे. सिहोरा परिसरात धानाचे प्रमुख पिक आहे. धानाचे पिक शेतकऱ्यांच्या हातात येण्यासाठी महिनाभराचा कालावधी शिल्लक आहे. सध्या धान कापणी सुरू आहे. मळणीनंतर धानाची विक्री करण्यात येणार आहे. धान खरेदी केंद्रांवर चुकारे वाटपात विलंब होत आहे. शेतकऱ्यांच्या हातात पैसा नाही. धान पिकाची लागवड करताना कर्जाचे डोंगर आहे. बँका, सोसायटीच्या नजरा शेतकऱ्यांकडे लागलेल्या आहेत. धानाच्या उत्पादनाची चिंता कुणालाही नाही. केवळ वसुली मिळाली पाहिजे, अशा नोटीस येत असल्यामुळे शेतकऱ्यांची धाकधुकी वाढली आहे. जिल्ह्यात कृषी संजिवनी योजनेत सहभागी शेतकऱ्यांचा आकडा नाही. नियोजन चुकल्याने शेतकऱ्यांना ही योजना न्याय देऊ शकली नाही. निकष तथा मुदतवाढ देण्याची क्षमता लोकप्रतिनिधीमध्ये आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींना आता शेतकऱ्यांसाठी आवाज बुलंद करण्याची गरज आहे. (वार्ताहर)