शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

पाणी पुरवठ्याची कामे होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2018 23:35 IST

६७ कोटी ७९ लाख रुपयांची नवीन पाणी पुरवठ्याची योजना आणि दूषित पाण्याच्या निवारणासाठी तात्कालीन उपाययोजना म्हणून १० ठिकाणी आरो लावण्याचे काम दोन महिन्यात पूर्ण करू, असे आश्वासन सर्वपक्षीय शिष्टमंडळात समोर नगराध्यक्ष सुनिल मेंढे यांनी भाकपचे जिल्हासचिव व माजी नगर सेवक हिवराज उके यांना दिले.

ठळक मुद्देआंदोलन : नगराध्यक्षांचे आश्वासन

आॅनलाईन लोकमतभंडारा : ६७ कोटी ७९ लाख रुपयांची नवीन पाणी पुरवठ्याची योजना आणि दूषित पाण्याच्या निवारणासाठी तात्कालीन उपाययोजना म्हणून १० ठिकाणी आरो लावण्याचे काम दोन महिन्यात पूर्ण करू, असे आश्वासन सर्वपक्षीय शिष्टमंडळात समोर नगराध्यक्ष सुनिल मेंढे यांनी भाकपचे जिल्हासचिव व माजी नगर सेवक हिवराज उके यांना दिले.दूषित पाण्याचे निराकरण, शुद्ध पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी उपाययोजना व इतर विषयांना घेवून भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव व माजी नगरसेवक हिवराज उके यांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय पाणी पिलाओ सत्याग्रह आंदोलन २३ मार्चला राणा भवन भंडारा येथून मोर्चा काढून करण्यात आला व मोर्चा नगर परिषदेवर नेण्यात आला.याप्रसंगी नगर परिषदेसमोर काँग्रेसचे धनराज साठवणे, भारिप बहुजन महासंघाचे चरणदास मेश्राम, डॉ. नितीन तुरस्कर, सदानंद इलमे, वामनराव चांदेवार, गजानन पाचे, हिवराज उके यांचे मार्गदर्शन झाले व पाणी प्रश्नासोबत विविध मागण्यांचे निवेदन देवून शिष्टमंडळाद्वारे नगराध्यक्षा सोबत चर्चा करण्यात आली.त्यात दोन महिन्यात नवीन पाणी पुरवठ्याची योजना मंजुर करू, १० ठिकाणी आरो लावून शुद्ध पाणी देवू, नदी शुद्धीकरणासाठी एरिगेशन विभागाला स्मरणपत्र लिहू तसेच नागनदीच्या घाणपाण्यावर ६० टक्के शुद्धीकरणाचे काम सुरू आहे, आवास योजनेच्या डीपीआरचे काम सुरू असून ५०० घरांचे अप्रुअल मिळाल्यास काम सुरू करू, फेरीवाला धोरणाच्या अंमलबजावणी साठी समिती स्थापन केली असून तात्काळ कार्यवाही करण्यात येईल, छोटा बाजार शॉपिंग सेंटरचे पुननिर्माण लवकरच करण्यात येईल, भूमीगत गटार योजना व घनकचरा व्यवस्थापनाची डीपीआर तयार झाले आहे आणि पुढीलवर्षी १५ ते २० टक्के घरटॅक्समध्ये वाढ करू, असे आश्वासन दिले गेले. नगराध्यक्षासोबत अभियंता जामूणकर, उपाध्यक्ष आशु गोंडाने, माजी उपाध्यक्ष रूबी चढ्ढा होते.