शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठ्याची कामे नियमबाह्य?

By admin | Updated: October 20, 2016 00:30 IST

पाणी जीवन आहे, परंतु पाणीपुरवठा योजना राबविणाऱ्या यंत्रणा नियमानुसार कामे करीत नसल्याने योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

देव्हाडी येथील प्रकार : ग्रामपंचायत सदस्यांनी केली तक्रारतुमसर : पाणी जीवन आहे, परंतु पाणीपुरवठा योजना राबविणाऱ्या यंत्रणा नियमानुसार कामे करीत नसल्याने योजनेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. देव्हाडी येथे चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून पाणीपुरवठा योजनेअंतर्गत कामे सुरु करण्यात आली. जलवाहिन्या केवळ अर्धा ते एक फुट खोदलेल्या नालीत ठेवण्यात आल्या आहेत. शासकीय इस्टीमेटमध्ये ते तीन फुटाचे केवळ अर्धा ते एक फुट खोदलेल्या नालीत ठेवण्यात आले. इस्टीमेटमध्ये ते तीन फुटाचे आहे. संबंधित अधिकाऱ्यांना तक्रार केल्यावर त्यांनी भेट देण्याचा सोपस्कार पार पाडला हे विशेष.तुमसर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून देव्हाडी ग्रामपंचायतचे नाव आहे. येथे सुमारे २५ वर्षापूर्वी ग्रामपंचायतीने स्वत:ची पाणीपुरवठा योजना सुरु केली होती. गाव शिवारात विहिरीतून संपूर्ण गावाला पाणीपुरवठा करण्यात येतो. मुख्य व इतर जलवाहिण्या जीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतीने काही जलवाहिन्या बदलविण्याचा ठराव घेतला. ४ लक्ष ५७ हजार ५६८ व ४ लक्ष ९९ हजार १७५ किमतीच्या दोन जलवाहिन्या नवीन घालण्याचा ठराव मंजूर केला. रितसर पंचायत समितीमधील पाणीपुरवठा योजना कार्यालयाकडे तो पाठविण्यात आला. पाणीपुरवठा विभागाच्या कार्यालयाने कामाचे करारनामे तयार केले.या इस्टीमेटमध्ये जलवाहिन्यात ३ फूट नाली खोदल्याचे नमूद केले आहे. परंतु येथे मात्र कुठे अर्धा फुट, कुठे एक फुट तर काही ठिकाणी तीन फुट नाली तयार केली. नियमानुसार कामे होत नाही अशी तक्रार माजी उपसरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य शैलेश ठाकरे, गुड्डू मसरके यांनी पाणीपुरवठा विभागाकडे केली. तीन दिवसापूर्वी संबंधित विभागाचे दोन अभियंत्यांनी पाहणी केली. ग्रामपंचायतीला केलेली कामे पुन्हा खोदकाम करून जलवाहिण्या पाहण्याकरिता खोदण्याचे निर्देश दिले. सोमवारी येणार असल्याचे सांगितले, परंतु संबंधित अभियंते आले नाही.ग्रामपंचायतीला प्राप्त निधीतून ही कामे होत असल्याने या संपूर्ण कामावर ग्रामपंचायतीचे नियंत्रण आहे. पाणीपुरवठा योजनेची संबंधित कामे सुरु करण्यापूर्वी ग्रामपंचायतीने संबंधित प्लास्टीक जलवाहिन्या तथा खोदकाम सुरु असताना अभियंत्यांना माहिती देण्याचा नियम आहे. कामे सुरु असताना कंत्राटदार नियमानुसार काम करीत आहे, हे पाहण्याकरिता (अभियंत्यांना कळविण्याची गरज होती. येथे कर्तव्यात कसूर करण्यात आल्याचे प्रथमदर्शी दिसत आहे.पंचायत समिती कार्यालय तुमसर ते देव्हाडीचे अंतर केवळ पाच कि.मी. आहे. केवळ इस्टीमेट तयार करणे व त्याचे मोजमाप करून देणे एवढेच काम या विभागाचे आहे का? हा प्रश्न आहे. तक्रार केल्यावरही गंभीर दखल येथे घेण्यात येत नाही. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी लेखी तक्रार दिल्यावरही दखल घेण्यात आलेली नाही. (तालुका प्रतिनिधी)पाणीपुरवठा योजनेची कामे संबंधित पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी येऊन पाहतात. नियमबाह्य कामे झाली असतील तर त्यांचे बिल मिळणार नाही. - बी.के. बावनकुळे, ग्रामविकास अधिकारी, देव्हाडीचार दिवसापूर्वी जलवाहिन्या जाऊन बघितल्या. नाली खोदकाम नियमानुसार आहे किंवा नाही हे पाहण्याकरिता नाली उकरुन काढण्यास सांगण्यात आले. बैठकीत व्यस्त असल्याने येता आले नाही, परंतु पुन्हा भेट देऊन संपूर्ण पाहणी करण्यात येईल.- धनंजय बावनकर, उपविभागीय अभियंता, पाणीपुरवठा विभाग, तुमसर