पाण्यासाठी महिलांची भटकंती : प्रशासनाचे दुर्लक्ष, लोकप्रतिनिधींची उदासिनताप्रल्हाद हुमणे जवाहरनगरजिल्हा परिषद शहापूर ग्रामीण प्रादेशिक नळ पाणीपुरवठा अंतर्गत आठ गावांना होत असलेला पाणीपुरवठा पाच दिवसापासून बंद करण्यात आलेला आहे. परिणामी १ हजार २०० नळ जोडणी धारकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. याकडे वरिष्ठ विभागाने लक्ष देण्याची नितांत गरज आहे.जिल्हा परिषद शहापूर ग्रामीण प्रादेशिक नळ पाणीपुरवठा अंतर्गत ग्रामपंचायत बेला रहदारीत जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले. याठिकाणी कोरंभी स्थीत वैनगंगा नदी किनाऱ्यावर जलसोस्त्र निर्माण करण्यात आले. याठिकाणाहून पाणीपुरवठा बेला येथे करण्यात येतो. बेला जलशुद्धीकरण केंद्राद्वारे शुद्ध पाणीपुरवठा बेला, मुजबी, उमरी-फुलमोगरा, भोजापूर, शहापूर, गोपीवाडा, परसोडी, ठाणा या गावांना करण्यात येतो. या जलशुद्धीकरण केंद्राचे देखभाल दुरूस्ती ग्रामपंचायत बेला यांच्याकडे मागील २०१५-१६ मार्चपर्यंत अटी व शर्तीवर देण्यात आली होती. तदनंतर २०१६-१६ या कालावधीत करारनामा जिल्हा परिषद भंडारा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने केलेली नाही. माजी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांच्या तोंडी सुचनेनुसार दोन महिने ग्रामपंचायत बेला यांनी चालवावे. नंतर आपण करारनामा करू, असे सदर ग्रामपंचायतला सांगितले. आज पाच महिने लोटून गेले. मात्र जिल्हा प्रशासनाने ग्रामपंचायत बेला यांच्याशी पाणीपुरवठा सुरू करण्याबाबद करारनामा केलेला नाही. सदर अधिकारी आज करतो उद्या करून अशी भुलथात देत या योजनेकडे दुर्लक्ष करीत आहे, असे दिसून येते. कालांतराने ग्रामपंचायत बेला यांनी पाणीपुरवठा योजनेसाठी लावलेले रोजंदारी मजुर बंद करण्यात आले. परिणामी सदर आठ गावांचा पाणीपुरवठा बंद झालेला आहे. याला दोषी कोण हा संशोधनाचा प्रश्न येथे येत आहे. यामुळे येथील नळ जोळणीधारक महिला शुद्ध पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. या गावातील ग्रामपंचायत सरपंच यांना नळ बंद कशामुळे करण्यात आले याविषयी साधी सुचना सदर विभागाकडून देण्यात आलेली नाही. यावरून पाणीपुरवठा विभाग व लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करीत असल्याचे समजतेग्रामपंचायत बेलासोबत चालु वषर्त्तचा करारनामा जिल्हा परिषदेने केलेला नाही. सदर कामावर १० रोजंदार मजुरांना मजुरी देण्यासाठी ग्रामपंचायतकडे पैशा शिल्लक नाही. तुरटी, ब्लिचिंग यांच्या खर्च वाढत आहे. जिल्हा परिषदेने आम्ही थकबाकी दिलेली नाही. करानामा न करता आम्ही नळयोजना कशी काय चालविणार जर कमी जास्त झाल्यास कोण जिम्मेदार राहणार परिणामी आम्ही पाणीपुरवठा चालवून सकत नाही. सुरू करावयाचे असेल तर आधी करारनामा करा मगच आम्ही विचार करू याबाबद सात ते आठ वेळा जिल्हा परिषदेला याबाबद पत्र व्यवहार करण्यात आलेले आहे.-शारदा गायधने, सरपंच ग्रामपंचायत बेला.
आठ गावांचा पाणीपुरवठा ठप्प
By admin | Updated: August 11, 2016 00:27 IST