शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

जलसंपदामंत्र्यांनी घेतला अधिकारी, कार्यकर्त्यांचा क्लास

By admin | Updated: January 28, 2015 23:09 IST

बावनथडी प्रकल्प व लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी प्रकल्पाची सद्यस्थिती, रखडलेली कामे, पुर्णत्वास येणाऱ्या अडचणीची माहिती जाणून घेऊन तुमसर विधानसभा मतदारसंघात

तुमसर : बावनथडी प्रकल्प व लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी प्रकल्पाची सद्यस्थिती, रखडलेली कामे, पुर्णत्वास येणाऱ्या अडचणीची माहिती जाणून घेऊन तुमसर विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या पराभवासह पक्ष संघटनेसंदर्भात अडीच तासांचा क्लास राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी घेतला.यावेळी त्यांनी बावनथडी प्रकल्पाचे उपविभागीय अभियंता निशिकांत पनके तथा इतर अधिकाऱ्यांनी सिंचन क्षमता, रखडलेली कामे, मूळ किंमत व सध्याची किमतीची माहिती घेतली, जलक्षमता किती आहे, या प्रश्नाच्या उत्तरावर अधिकारी चांगलेच गोंधळले. त्यानंतर प्रकल्पाची सविस्तर माहिती ठेवा, असा सल्ला अधिकाऱ्यांना दिला. जलसंपदा विभागाचे उपविभागीय अभियंता बॅनर्जी यांनी चांदपूर, बघेडा, आंबागड, कारली या प्रकल्पासह रबी व खरीप पीक सिंचन क्षेत्राची माहिती दिली. तुमसरचे तहसीलदार सचिन यादव यांनी नऊ गावात पाणी टंचाई असल्याचे सांगितले. त्यानंतर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत काही वेळ विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव, शहरातील पक्षसंघटना, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, नगरसेवकांची संख्या, लोकसभा व विधानसभा मतदारसंघात जातीनिहाय मतदारांची संख्या किती? पुढे कोण निवडणूक लढणार आहे. मागील २० वर्षापूर्वी कोण आमदार होते, याची सविस्तर माहिती लिहून घेतली.पक्ष संघटनेतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ना.विजय शिवतारे यांच्याशी संवाद साधला. यावेळी माजी आ.नरेंद्र भोंडेकर, जिल्हाप्रमुख राधेश्याम गाढवे, जिल्हाउपप्रमुख प्रशांत लांजेवार, राजेंद्र पटले, लालू हिसारिया, सुधाकर कारेमोरे, प्र्रकाश पारधी, शेखर कोतपल्लीवार, मेहताब सिंग ठाकूर, संतोष पाठक, रमन खोब्रागडे, बालू मदनकर, मदन इलमे, मोहने, साहेबराव पारधी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद भोईटे, पोलीस निरीक्षक किशोर गवई, नायब तहसीलदार अरविंद हिंगे, महेंद्र सूर्यवंशी, तालुका कृषी अधिकारी दौलत गभणे यांच्यासह विभागप्रमुख उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)