शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
3
धनंजय मुंडेंनी माफी मागावी! ‘वंजारा-बंजारा एकच’ वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक
4
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
5
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
6
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
7
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड
8
IPO News: १८ सप्टेंबरला उघडणार 'या' कंपनीचा ५६०.२९ कोटी रुपयांचा IPO; काय आहेत डिटेल्स?
9
अंत्ययात्रा काढली, चितेवर ठेवलं, पण मुखाग्नी देणार तोच जिवंत झाली महिला, आता अशी आहे प्रकृती
10
इंदिरा एकादशी २०२५: पितरांना मोक्ष देणारी इंदिरा एकादशी; तुळशीचा 'असा' वापर आठवणीने टाळा
11
'श्रीयुत गंगाधर टिपरे' मालिकेचा इंटरेस्टिंग किस्सा, आबांच्या भूमिकेतील दिलीप प्रभावळकर म्हणाले...
12
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
13
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
14
एक घर अन् ४२७१ मतदार! निवडणूक तोंडावर अन् AIने केली पोलखोल; कुठे घडला हा प्रकार?
15
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video
16
वारंवार हल्ले करणाऱ्या कुत्र्यांना जन्मठेप होणार! उत्तर प्रदेश सरकारने घेतला मोठा निर्णय
17
इश्क का जुनून! ६ मुलांचा ३८ वर्षीय बाप पडला १७ वर्षांच्या मुलीच्या प्रेमात; पुढे झालं असं काही...
18
ऑनलाईन गेमचा नाद लय बेकार! ११ लाख गमावल्यानंतर सहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या
19
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी आमदार निर्मला ठोकळ यांचे निधन 
20
वाशीच्या दिशेने येणारा ट्रक उड्डाणपुलावरून कोसळला, मुंबई-पुणे महामार्गावरील घटना

पाण्याची पातळी दोन मिटरने खालावली

By admin | Updated: April 21, 2015 00:22 IST

भूजलाच्या स्थिर पाण्याच्या पातळीचा अभ्यास करण्यात आला.

प्रशांत देसाई भंडाराभूजलाच्या स्थिर पाण्याच्या पातळीचा अभ्यास करण्यात आला. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी २५.०२ टक्के कमी पर्जन्यमान झाले. यात २५ पाणलोट क्षेत्रातील ७४ विहिरींचे निरीक्षण करण्यात आले आहे. यातील ५१ विहिरींच्या पाण्याच्या पातळीत दोन मिटरची घट आढळून आल्याची गंभीर बाब पुढे आली आहे. १५ जूनपर्यंत ६६ गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता असल्याचा धक्कादायक अहवाल भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागाने शासनाला सादर केला आहे.मार्च महिन्याच्या अखेरीस जिल्ह्यात उष्णतामान वेगाने वाढत आहे. आगामी तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर भूजल सर्वेक्षण विभागाने केलेल्या निरीक्षणानुसार जिल्ह्यातील नऊ लघू पाणलोट विहिरींच्या पातळीत एक ते दोन मीटरने पाणी पातळी खालावली असल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे. भूजलाच्या स्थिर पाण्याच्या पातळीचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागाने जिल्ह्याची २५ पाणलोट क्षेत्रात विभागणी केली. पाणलोट क्षेत्रातील उतारानुसार प्रत्येक पाणलोट क्षेत्र तीन भागात अनुक्रमे रनआॅफ झोन, रिचार्ज झोन आणि स्टोरेज झोन मध्ये विभागण्यात आला. या प्रत्येक झोनमध्ये एक अशा ७४ निरीक्षण विहिरी निश्चित करण्यात आल्या असून स्थित पाण्याच्या पातळीची वर्षातून चार वेळेस (जानेवारी, मार्च, मे व आॅक्टोंबर) मोजमाप करून नोंद घेण्यात आली. मागील पाच वर्षाच्या सरासरी स्थिर पाण्याच्या पातळीसोबत तुलनात्मक अभ्यास मार्च २०१५ मध्ये करण्यात आला. जिल्ह्यात सरासरी १३३०.२१ मिमी पाऊस पडायला हवा. मात्र, जून ते मार्चपर्यंत ९९७.३९ मिमी पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ३३२.८३ मिमी पाऊस कमी पडला आहे. वरिष्ठ भूवैज्ञानिकांनी शासनाला सादर केलेल्या अहवालातून काही धक्कादायक बाबी पुढे आल्या आहेत. यात, जिल्ह्यात सामान्य मान्सून पर्जन्यमानाच्या तुलनेत जून २०१४ ते मार्च २०१५ या कालावधीत २५.०२ टक्के कमी पर्जन्यमान झाले आहे. सातही तालुक्यात सामान्य मान्सून पर्जन्यमानापेक्षा कमी झालेला आहे. ७४ निरीक्षण विहिरीपैंकी ५१ विहिरीमध्ये पाण्याची पातळीत घट आढळून आलेली आहे. तर २३ निरीक्षण विहिरींमध्ये पातळीत वाढ आलेली आहे. नऊ लघू पाणलोट क्षेत्रातील निरीक्षण विहिरींच्या पातळीत एक ते दोन मीटर घट आढळून आलेली आहे. या पाणलोट क्षेत्रातील ६६ गावांमध्ये एप्रिल ते जून या कालावधीत पाणी टंचाई भासण्याचा गंभीर इशारा या अहवालातून दिला आहे. सोबतच पर्जन्यमान कमी झाल्याने जिल्ह्यातील प्रमुख नद्यांना पाण्याचा प्रवाह जास्त काळपर्यंत राहणार नाही. नद्यांच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शहरांच्या नळ योजनांना व प्रादेशीक नळ योजनांवर लक्ष ठेवावे. ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद व महाराष्ट्र जिवन प्राधिकरण यांच्या प्रगतीपथावरील योजना प्राधान्याने पूर्ण कराव्या.हातपंपाची पाईपलाईन वाढविणे व कामे पूर्ण कराव्या, रेती उपस्याकरिता शिफारस केलेल्या रेती घाटांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही ठिकाणावरून रेतीचा उपसा करू देऊ नये, अशा सुचना या अहवालातून देण्यात आलेल्या आहेत.पाणलोट क्षेत्रातील प्रातिनिधिक तीन विहिरींचा समावेश करण्यात आला आहे. माथा ते पायथा अशी पाण्याची पातळी मोजण्यात येते. १९७३ पासून ही पद्धत अविरत सुरू आहे. विहिरींची संख्या वाढली आहे. मागील दोन महिन्यात भूगर्भातून बेसुमार पाणी उपसा सुरू असल्याने सरासरी पाणी पातळीत वेगाने घट झाली आहे. मागील आठवड्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे पाण्याच्या पातळीत समाधानकारक वाढ झाली आहे.- विजय भुसारीवरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा भंडारा.