चुल्हाड (सिहोरा) : महत्वाकांक्षी सोंड्याटोला सिंचन प्रकल्पात पाण्याचा उपसा बंद करण्यात आलेला आहे. यामुळे सुरक्षा गार्डाचा मनमानी कारभार सुरु झालेला आहे. धरणातील साठवणुक पाण्याचा मासोड्या पकडण्यासाठी अनधिकृत विसर्ग सुरक्षा गार्डानी केलेला आहे.सिहोरा परिसरातील १० हजार हेक्टर आर शेती सिंचीत करण्यासाठी बावनथडी नदीवर सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प साकारण्यात आलेला आहे. हा प्रकल्प पुर्णत्वासाठी शासनाने ११० कोटी खर्च केले आहेत. प्रकल्पाने पाण्याचा उपसा केलेले पाणी चांदपूर जलाशयात साठवणूक करण्यात येत आहे. सन २००७ पासून प्रकल्प पाण्याचा उपसा करीत आहे. परंतु प्रकल्पाचे हस्तांतरण सध्यातरी रखडले आहे. यामुळे पाण्याचा उपसा करतांना प्रकल्पाला अनेक संकल्पना सामोरे जावे लागत आहे. हा प्रकल्प पाण्याचा उपसा वर्षभर करीत नाही. ऐन पावसाळ्यात पाण्याचा उपसा करण्यात येत आहे. यामुळे शेतकऱ्यांना प्रकल्प संजीवनी ठरत आहे. अल्प पावसाळ्यात शेतकऱ्यांना मारणारा प्रकल्प आहे. पंरतु या प्रकल्पात बारा भानगडी निर्माण झाल्याने चर्चा घेतली आहे. पावसाळा पुर्वी प्रकल्पातील बॅटऱ्या जळाल्या होत्या. पाण्याचा उपसा करणाऱ्या टाकीत गाळ तयार झाल्याने यंदा प्रकल्प सुरु होणार किंवा नाही असा संभ्रम निर्माण झाला होता. संबंधीत विभागाने समस्या निकाली काढण्यासाठी निधी नसल्याचे सांगुन टाकले होते. इकडे पावसाचा थांगपत्ता नसल्याने शेतकरी कासावीस झाला होता. प्रकल्प सुरु करण्यासाठी मोर्चे निघाले. रास्ता रोको झाले. परंतु प्रकल्पाला निधी मिळाल नाही. प्रशासकिय यंत्रणेने प्रकल्पात तड ठोकला. प्राथमिक स्तरावर बॅटऱ्या रिचार्ज केली. यामुळे प्रकल्पात काही प्रमाणात समस्या निकाली काढण्यात आली. पावसाळ्यात याच बॅटऱ्याने पंपगृह सुरु करण्यात आला होता. तथा पाण्याचा उपसा करण्यात आल्याने खरिप हंगामात शेतकरी तरले. सध्यातरी धानाचे उत्पादन समाधानकारक असल्याचे शेतकरी सांगत आहे.दरम्यान, नदी पात्रात पाण्याचा अल्प जल साठा निर्माण झाला. याशिवाय चांदपुर जलाशयातील चिकारचे दरवाजे तुटल्याने संपूर्ण पाण्याचा विसर्ग करण्यात आला असता प्रकल्पाने पाण्याचा उपसा बंद करण्याचा निर्णय घेतला. तत्पूर्वी पाण्याचा उपसा करण्याचा कालावधी पूर्ण झाल्याच्या कारणावरुन २५ सप्टेंबरला प्रकल्पातील पंपगृह बंद करण्यात आले आहे. यामुळे या प्रकल्पाला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणात १ मीटर पाणी अडविण्यात आलेला आहे. दरम्यान ६ नोव्हेंबर ला या प्रकल्पाचे अच्छे दिन आले आहे. ५५ नविन बॅटऱ्या या प्रकल्पाला प्राप्त झालेल्या आहेत. येत्या सत्रात पाण्याचा उपसा करण्यासाठी होणारी बोंबाबोंब थांबली आहे.प्रकल्प स्थळात बॅटऱ्या जळाल्याचे वृत्त सातत्याने लोकमत ने तत्कालीन वेळे प्रकाशित करित शासनाचे लक्ष वेधले होते. यामुळे नविन बॅटऱ्या उपलब्ध झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान सप्टेंबर महिण्यात प्रकल्पाने पाण्याचा उपसा बंद करण्यात आल्या नंतर या प्रकल्पाची सुरक्षा करण्याची जबाबदारी सुरक्षा गार्डाच्या खांद्यावर देण्यात आली आहे. परंतु या गार्डाचा प्रकल्प स्थळात मनमानी कारभार सुरु झाल्याचे धक्कादायक वास्तव निदर्शनास आले आहे. पंपगृहाच्या टाकीत पाणी आहे.याशिवाय धरणात १ मिटर पाणी अडविण्यात आलेला आहे. या धरणाला ६१ दरवाजे आहेत. धरणात पाणी अडविण्यात आल्याने दिड किमी अंतर पर्यंत असलेल्या नदी काठावरील गावकऱ्यांना याच पाण्याचा उपयोग होत आहे. जनावरांना पिण्याचे पाणी, नळा योजना तथा अन्य कामासाठी गावकरी पाण्याचा वापर करित आहेत. पंरतु या पाण्याचा अनधिकृत विसर्ग १८ नोव्हेंबर ला रात्री ८ वाजता सुरक्षा गार्डाना केला आहे. टाकीतील मासोळ्या पकडण्यासाठी धरणाचा एक दरवाजा उघडून पाणी रिकामा करण्यात आलेला आहे. यामुळे आता टाकीत अल्प पाणी आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे असे आदेश नसतांना गार्ड यांनी पाण्याचा विसर्ग केला आहे.सद्यस्थित वरिष्ठ अधिकारी दररोज या प्रकल्पाला भेट देत नाही. याच संधीचा फायदा गार्ड घेत आहेत. हेच गार्ड वृत्त संकल्प करण्यास बंदी घालत आहेत. या गार्डाचा मुजोर कारभार प्रकल्प स्थळात दिसून येत आहे. पाण्याचा दुरुपयोग करणाऱ्या या सुरक्षा गार्डावर कोणती कारवाई होतो, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)
सिंचन प्रकल्पातून पाण्याचा उपसा बंद!
By admin | Updated: November 22, 2014 00:14 IST