शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

जानेवारी महिन्यापासून मिळणार निम्न चुलबंद प्रकल्पाचे पाणी

By admin | Updated: October 28, 2016 00:27 IST

तालुक्यातील दुर्गाबाई डोह कुंभली येथे मागील २१ वर्षापासून तयार होत असलेल्या निम्न चुलबंद प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून येत्या ...

बाळा काशीवार यांची माहिती : शिवणीबांध, कुंभली, खंडाळा येथे पहिल्यांदा सोडणार पाणीसंजय साठवणे  साकोली तालुक्यातील दुर्गाबाई डोह कुंभली येथे मागील २१ वर्षापासून तयार होत असलेल्या निम्न चुलबंद प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून येत्या जानेवारी २०१७ पासून या प्रकल्पातील पाणी शेतीला सिंचनासाठी मिळणार आहे. अशी माहिती आ.बाळा काशीवार यांनी दिली. यावेळी या विभागाचे उपविभागीय अभियंता डी.ई. चोपडे उपस्थित होते. प्रकल्पाच्या सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर शिवणीबांध, कुंभली व सावरबंध या गावातील तीन हजार हेक्टर शेतजमिनीला सिंचनाचा फायदा होणार आहे.१९९५ साली साकोली तालुक्यातील कुंभली येथील चुलबंद नदीवर निम्नचुलबंद प्रकल्पाचे काम सुरु झाले. या प्रकल्पात एकुण सात दरवाजे लावण्यात आले असून या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या प्रकल्पापासून २३ गावातील ५ हजार ३९७ हेक्टर शेतजमिनीला सिंचनाचा फायदा होणार आहे. या प्रकल्पांतर्गत चुलबंद नदीचे पाणी अडवून संबंधित पाणी कालव्याद्वारे कुंभली, सावरबंध, खंडाळा, शिवणीबांध, पाथरी, साकोली व बोदरा या गावातील तलावात पाणी सोडण्यात येणार आहे व या तलावातील पाणी उन्हाळी व पावसाळी धानलागवडीसाठी याचा उपयोग होणार आहे.सदर प्रकल्पाला तब्बल २१ वर्षाचा कालावधी लागला असून या प्रकल्पाचे पाणी शेतीकरिता लवकरात लवकर मिळावे यासाठी आ.बाळा काशीवार यांनी प्रयत्न केले. काल कुंभली येथे संबंधित अधिकाऱ्यांना बोलावून त्याची पाहणी केली व पंप हाऊसचे काम युद्धस्तरावर करून येत्या उन्हाळी पिकाकरिता पाणी देण्याची सूचना अधिकाऱ्यांना दिली. अधिकाऱ्यांनीही येत्या जानेवारी पर्यंत पंपहाऊसचे काम पूर्ण करून पाणी देण्याचे आश्वासन दिले.