शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
4
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
5
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
6
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
7
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
8
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
9
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
10
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
11
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
12
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
13
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
14
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
15
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
16
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
17
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
18
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
19
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
20
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
Daily Top 2Weekly Top 5

बावनथडीच्या पात्रातून उपयोगाविना पाण्याचा विसर्ग

By admin | Updated: July 13, 2016 01:37 IST

बावनथडी नदी पात्रातून पाणी ओसरले असतानाही सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाचा खंडीत वीज पुरवठा सुरू करण्यात आलेला नाही.

प्रकल्पस्थळात पाण्याचा उपसा बंद : धरणाचे दरवाजे उघडेच, १६ व २३ ला सिहोऱ्यात ‘रस्ता रोको’ आंदोलन चुल्हाड (सिहोरा) : बावनथडी नदी पात्रातून पाणी ओसरले असतानाही सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाचा खंडीत वीज पुरवठा सुरू करण्यात आलेला नाही. यामुळे नदी पात्रातून पाण्याचा उपयोगाविना विसर्ग सुरू आहे. या प्रकल्पावरून विरोधक व सत्ताधारी आक्रमक झाले आहेत. सिहोरा परिसरातील १४ हजार हेक्टर शेती ओलीताखाली आणण्यासाठी बावनथडी नदीवर सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प साकारण्यात आला. या प्रकल्पाने नदी पात्रातून उपसा केलेले पाणी चांदपूर जलाशयात साठवणूक करण्यात येत आहे. यामुळे हा प्रकल्प पावसाळ्यात महिनाभर नदी पात्रातून पाण्याचा उपसा करीत आहे. वर्षभरापासून प्रकल्पाचा वीज पुरवठा खंडीत आहे. ३५ लाख ९३ हजार रूपयांचा वीज देयकांची थकबाकीमुळे महावितरणने वीज पुरवठा खंडीत करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान राज्य शासनाने चितळे समितीच्या शिफारसी लागू केल्याने पाणी पट्टी करांच्या वसुलीमधून वीज देयक भरण्याचे निर्देशीत केले आहे. यामुळे पाटबंधारे विभागाला ही जबाबदारी देण्यात आली आहे. परिसरातील शेतकऱ्यांकडे पाणी पट्टी करांचे ३ कोटी रुपये वसुली शिल्लक आहे. शेतकऱ्यांनी विविध कारणे पुढे करीत पाणीपट्टी करांची वसुली प्रभावित केल्याने सोंड्याटोला प्रकल्पाचे विजेचे थकीत देयक भरण्यात आले नाही. यामुळे यंदा प्रकल्प पाण्याचा उपसा करणार नाही. असे निश्चित असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान थकीत विजेचे देयक भरण्यात आले नाही. यामुळे प्रकल्प स्थळात पाण्याचा उपसा करण्याचा कालावधी सुरु असताना अंधार पसरलेला आहे. पाणीपट्टी करांची वसुली मधून विजेचे देयक भरण्याचे अट लागू करण्यात आली आहे. मागील पंधरवाड्यात बावनथडी नदीपात्रातून तीन पुराचे पाणी ओसरले आहे. प्रकल्पाला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणाचे दरवाजे उघडे आहे. पुराचे पाणी ओसरताच नदीच्या पात्रात पाण्याची वानवा आहे. नदीचे पात्रात तासाभरासाठी पुराचे पाणी राहत असल्याचा अनुभव आहे. या प्रकल्पस्थळात पॅनल विभागात पाणीचे पाणी असल्याने शॉर्ट सर्कीट होण्याची भीती आहे. जलाशयात केवळ ८ फुट पाणी आहे. ओलीताखाली शेती आणण्यासाठी पावसाळा अखेर ३६ फुट पाणी साठवणूक करण्याची गरज आहे. यामुळे यंदा प्रकल्प स्थळात ठिकठाक नाही. असे चित्र आहे. दरम्यान प्रकल्प स्थळात खंडीत वीज पुरवठा सुरु करण्यासाठी विरोधक व सत्ताधारी आक्रमक झाले आहे. (वार्ताहर)