शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

जलकुंभाची सुरक्षा वाऱ्यावर

By admin | Updated: January 24, 2015 22:48 IST

सव्वा लक्ष लोकसंख्या असलेल्या भंडारा शहरात पाणी पुरवठा होत असलेल्या जलकुंभाची सुरक्षा वाऱ्यावर आहे. सहजतेने कुणीही या प्रतिबंधीत क्षेत्रात प्रवेश करू शकतो. संताजी वॉर्डातील व शास्त्रीनगर

नगरपालिकेचे दुर्लक्ष : जलकुंभाचे प्रवेशद्वार उघडे, सुरक्षा रक्षकाची गरजइंद्रपाल कटकवार - भंडारासव्वा लक्ष लोकसंख्या असलेल्या भंडारा शहरात पाणी पुरवठा होत असलेल्या जलकुंभाची सुरक्षा वाऱ्यावर आहे. सहजतेने कुणीही या प्रतिबंधीत क्षेत्रात प्रवेश करू शकतो. संताजी वॉर्डातील व शास्त्रीनगर चौकातील दसरा मैदानात असलेल्या जलकुंभांच्या सुरक्षेची लख्तरे वेशीवर टांगण्यात आली आहे. जीवनदायीनी वैनगंगा नदीतून भंडारा शहराला पाणीपुरवठा केला जातो. पाणीपुरवठ्याची जबाबदारी नगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाची आहे. नगरपालिकेच्या हद्दीत पाच जलकुंभ आहेत. यापैकी एक संताजी वॉर्डात, दुसरे शास्त्रीनगर चौकात, तिसरे पोलीस वसाहत, चवथे जलकुंभ रुग्णालय परिसर व पाचवा जलकुंभ सिव्हील लाईन परिसरात आहे. यापैकी सर्वात महत्वपूर्ण जलकुंभ हे संताजी वॉर्ड व शास्त्रीनगर येथील समजली जाते. शास्त्रीनगर जलकुंभावरील बाजूस असलेल्या प्रवेशद्वार वाकलेल्या स्थितीत आहे. या प्रवेशद्वाराभोवती अर्धवट तारेचे कुंपण आहे. या प्रवेशद्वारातूनच लहान मुले आत जात असल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. जलकुंभ परिसरात कचराच कचरा साचला आहे. टाकीत पाच मजले असून पायरीवरून कुणीही वर चढू शकतो. सद्यस्थितीत या टाकीत पाणीसाठा नाही. बोरवेलच्या आधारे या टाकीत पाणीसाठा केला जातो. परंतु हे काम सध्या बंद आहे. जलकुंभाची सुरक्षा ऐरणीवर आहे. दसरा मैदानात असलेला हा जलकुंभ तिन्ही बाजूने उघाड पडला आहे. टाकीच्या बाजूलाच कचरा कंटेनरचा भंगार पेट्या ठेवण्यात आल्या आहेत. संताजी वॉर्डात असलेल्या मुख्य जलकुंभाच्याखालीच नगरपालिकेचा पाणीपुरवठा विभाग आहे. स्वच्छता विभागही येथेच आहे. या ठिकाणी २४ तास पाण्याची साठवण केली जाते. सकाळच्या सत्रात बिल भरणारे नागरिक गर्दी करीत असतात. टाकीच्या वर चढण्यासाठी पायरीवर प्रवेशद्वार असून त्याला नेहमी कुलूप असते. मात्र प्रवेशद्वाराची उंची कमी असल्याने त्यावरून उडी मारून कुणीही प्रवेश करू शकतो. त्यामुळे मुख्य असलेल्या जलकुंभ परिसरात सुरक्षा करण्यासाठी चौकीदार किंवा सुरक्षा गार्डाची गरज आहे.