शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

१० हजार १७१ हेक्टर शेतीला सिंचनाची प्रतीक्षा

By admin | Updated: October 25, 2015 00:35 IST

बावनथडी आंतरराज्यीय प्रकल्पाची एकूण सिंचन क्षमताा २७,७०८ हेक्टर असून जून २०१७ पर्यंत १०,१७१ हेक्टर शेतीचा सिंचनाची प्रतिक्षा आहे.

बावनथडीसाठी १३१ कोटीची गरज : चालू हंगामात खरीप, रबीला प्रकल्पातून पाणी मिळणार नाहीमोहन भोयर तुमसर बावनथडी आंतरराज्यीय प्रकल्पाची एकूण सिंचन क्षमताा २७,७०८ हेक्टर असून जून २०१७ पर्यंत १०,१७१ हेक्टर शेतीचा सिंचनाची प्रतिक्षा आहे. भूसंपादनाकरिता २७.६२ कोटी रुपयांची गरज असून मार्च २०१६ पर्यंत २६.९५ कोटी रुपये देण्यात आले. येथे चार वितरिकेची कामे अपूर्ण आहे. खरीप व रबी हंगामात सिंचनाकरिता प्रकल्पातून पाणी मिळण्याची आशा नसून प्रकल्पात सध्या २० टक्के जलसाठा आहे.तालुक्यातील सितेकसा येथे बावनथडी नदीवर हा आंतरराज्यीय प्रकल्प बांधण्यात आला. सन १९७४-७५ मध्ये या प्रकल्पाची मूळ किंमत ११.६६ कोटी इतकी होती. सन १९९३ मध्ये सुधारित प्रशासकीय मान्यता ७१.७९ कोटी इतकी होती. दुसरी सुधारित प्रशासकीय मान्यता १८२ कोटी होती. तिसरी सुधारित मान्यता ५६१.२६ कोटींची मिळाली. चौथी सुधारित प्रशासकीय मान्यता ८१३.८५ कोटींची असून २०१३-२०१४ मध्ये राज्य तांत्रिक सल्लागार समितीकडे २६ मे २०१५ च्या बैठकीत शिफारस करण्यात आली.प्रकल्पाचे गळभरणी सन २०१२ मध्ये करुन प्रकल्पात पाणीसाठा करणे सुरु करण्यात आले. धरण व डाव्या कालव्याचे काम मध्यप्रदेश शासनाने केले तर उजव्या कालव्याचे काम महाराष्ट्र शासनाने केले. महाराष्ट्रातील १७,५३७ हेक्टर सिंचन क्षेत्र आहे. या प्रकल्पाची एकूण सिंचन क्षमता २७,७०८ हेक्टर इतकी आहे. या प्रकल्पाचे तुमसर, मोहाडी व भंडारा तालुक्यातील ७७ गावांचा सिंचनाचा लाभ होणार आहे. गोबरवाही पाणी पुरवठा योजनेद्वारे २१ गावांना पाणी पुरवठा योजना सन २०१५ पासून कार्यान्वित झाली आहे.भूसपांदनाकरीता ३७.६२ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षितएकूण खाजगी जमीन १,८६७.८५ हेक्टर संपादित खाजगी जमिन १५१५.९१ हेक्टर, १४५ प्रकरणावर कारर्वा सुरु असून यात ३१५.९४ हेक्टर जमिनीचा समावेश आहे. निवाड्याद्वारे १९६.२५ हेक्टर, मार्च २०१६ पर्यंत २६ प्रकरणे, डिसेंबर २०१६ पर्यंत ६६ प्रकरणे. भूसंपादनाकरिता मार्च २०१६ पर्यंत १३४.७५ हेक्टरकरिता २६.९५ कोटी, मार्च २०१७ पर्यंत २१७.१९ हेक्टरकरिता ३७.६२ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मार्च २०१५ पर्यंत ६८३.४१ कोटी रुपये खर्च झाला आहे. प्रकल्पाची उर्वरित किंमत १३०.४४ कोटी आहे. सन २०१५-१६ करिता उपलब्ध अनुदान १२ कोटी होता. उर्वरित वितरण प्रणालीची कामे जून २०१७ पर्यंत प्रस्तावित आहे. सन २०१५-१६ भूसंपादन व बांधकामापोटी निधी ४८.२० कोटी, सन २०१६-१७ मध्ये भूसंपादन व बांधकामाकरिता निधी ७४.६३ कोटी अपेक्षित आहे.प्रकल्पाकरिता अडचणी प्रकल्पाच्या ८१३.८५ कोटी चतुर्थ सुधारित मान्यतेस मंजुरीची गरज आहे. ३५१.९४ हेक्टर खाजगी जमिनीचे डिसेंबर २०१६ पर्यंत संपादन करने, सन २०१५-१६ व सन २०१६-१७ आर्थिक वर्षात प्रकल्पकरिता ४८.२० कोटी व ७४.६३ कोटींचा निधी मिळणे आवश्यक आहे. ३५ ठिकाणी खंडीत लघु कालव्याची कामे पूर्णत्वाकरिता १६५ हेक्टरचे भूसंपादन डिसेंबर २०१५ पर्यंत करणे गरजेचे आहे.