पहेला : भंडारा तालुक्यात मागील तीन दिवस सतत पाऊस पडला. परंतु ते सर्व पाणी नदीला वाहुन गेले. कारण धानाचे पऱ्हे लहान असल्यामुळे शेतकरी रोवणी करू शकले नाही. आतापर्यंत आलेल्या पावसातून एकही शेतकऱ्यांनी रोवणे केले नाही. ज्यांच्या शेतात सिंचनाची व्यवस्था आहे, अशा २५ टक्के शेतकऱ्यांनी रोवण्या सुरू केल्या आहेत.तालुक्यात झालेल्या पुनर्वसनाच्या पावसाने पऱ्यांना जिवदान मिळाले आणि शेतकऱ्यांनी पऱ्ह्यांना रासायनिक खत देणे सुरू केले. त्यामुळे पऱ्ह्याची वाढ लवकर होईल. तीन दिवस झालेल्या पावसाने शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा मिळाला असला तरी शेतकऱ्यांना मुद्याम लाभ झालेला नाही. अशीच समस्या असली तर शेतकरी पुन्हा संकटात सापडणार आहे. शेतकऱ्यावर दुबार पेरणीचा खर्च अगोदरच त्यांच्या जिवावर बेतला आहे. शेतीची मशागत करण्याकरिता लागलेला खर्च डोक्यावर बसलेला आहे.दरवर्षी पडणारा दुष्काळ व बँकेकडून घेतलेले कर्ज यामुळे शेतकरी पुतर अडचणीत सापडला आहे. आणि यात यावर्षी पुन्हा दुष्काळ पडला तर दुष्काळात तेरावा महिना अशी परिस्थिती निर्माण होईल व शेतकरी पुन्हा संकटात सापडेल. (वार्ताहर)
बळीराजाला जोरदार पावसाची प्रतीक्षा
By admin | Updated: July 28, 2014 23:23 IST