तुमसर: बावनथडी व वैनगंगा नदीवर तीन मोठे प्रकल्प तयार झाल्याने जीवनदायीनी वैनगंगेचे माडगी येथील पात्र कोरडे होण्याच्या मार्गावर आहे. येथील जलप्रवाह शेवटची घटका मोजत असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळते. सिंचन प्रकल्प निश्चितच वरदान आहेत. परंतु बारमाही वाहणारी नदी कोरडी होणे हे निश्चितच धोकादायक आहे. तुमसर बपेराजवळ बावनथडी नदी वैनगंगेला मिळते. बावनथडी नदी ही बारमाही वाहणारी नदी नाही. पावसाळ्यात ती भरभरुन वाहते. मात्र वैनगंगा नदी ही बारमाही वाहणारी नदी आहे. परंतु मागील चार ते पाच वर्षापासून बारमाही वाहणारी वैनगंगेचे पात्र कोरडे पडत आहे. वैनगंगेवर गोसेखुर्द येथे राष्ट्रीय प्रकल्प तयार करण्यात आला. वैनगंगेचे पाणी तिथे जमा होते. भंडारा येथे वैनगंगा नदीत मोठा जलसाठा सध्या उपलब्ध आहे. तुमसर तालुक्यात मात्र ठणठणाट दिसत आहे. मांडवी-वाहनी येथे बंधार्यामुळे नदी पूर्ण भरलेली आहे. बंधार्यापलिकडे नदीत केवळ रेतीच दिसते. नैसर्गिक प्रवाह बंद करता येत नाही म्हणून केवळ बारीक धार बंधार्यातून सोडली जात आहे. केंद्र १
नियोजनाअभावी वैनगंगेचे पात्र कोरडे
By admin | Updated: June 2, 2014 00:23 IST