शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

वैनगंगा शुद्धीकरणाला आणखी चार वर्षे लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 23:40 IST

एकेकाळी भंडारा जिल्ह्यासाठी ‘जीवनदायिनी’ ठरलेली वैनगंगा नदीचे पात्र ‘जीवघेणे’ ठरत आहे.

ठळक मुद्देपालकमंत्री बावनकुळे : शासनाचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू, तरीही लागणार वेळ

आॅनलाईन लोकमतभंडारा : एकेकाळी भंडारा जिल्ह्यासाठी ‘जीवनदायिनी’ ठरलेली वैनगंगा नदीचे पात्र ‘जीवघेणे’ ठरत आहे. नागपूरच्या नागनदीचे सांडपाणी लाखो हेक्टर जमिन सिंचित करणाऱ्या गोसेखुर्द धरणात सोडले जात आहे. त्यामुळे वैनंगगा नदी प्रदूषित झाली आहे. या नदीच्या शुद्धीकरणासाठी शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू असले तरी ही नदी शुद्धीकरणासाठी आणखी चार वर्षे लागणार असल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे यांनी सांगितले.पालकमंत्री झाल्यानंतर दर शनिवारला भंडाऱ्यात येण्याचे जाहीर केल्यानंतर ते जनतेच्या समस्या ऐकून घेण्यासाठी आले होते. तत्पूर्वी विश्रामगृहात पत्रकारांकडून जिल्ह्यातील समस्यांवर चर्चा केली. यावेळी एका प्रश्नावर त्यांनी ही माहिती दिली.यावेळी ना.बावनकुळे म्हणाले, नागनदीचे प्रदूषित पाणी रोखण्यासाठी शासनाकडून विविध उपाययोजना सुरू आहेत. आतापर्यंत केवळ ७० टक्के पाणी कोराडी, मौदा येथे रोखण्याचे काम झाले आहे. उर्वरित ३० टक्के पाणी वैनगंगा नदीत येत आहे. हे पाणी पूर्णत रोखण्यासाठी उमरेडकडे वळवावे लागणार आहे. त्यासाठी आणखी चार वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे दूषित पाण्याची समस्या तूर्तास तरी दूर होण्याची शक्यता नाही.भंडारा जिल्ह्याच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांकडे वाढीव २५ कोटी रूपयांची मागणी आपण केली असून त्या निधीतून रखडलेली कामे मार्गी लावण्यात येतील. याशिवाय जिल्हा नियोजनातून कपात केलेला ३० टक्के निधीही परत आणण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आपल्याकडे या जिल्ह्याची जबाबदारी असल्यामुळे आता भंडारा जिल्ह्यातील विकास दिसू लागेल, याची ग्वाही पालकमंत्र्यांनी दिली.केव्हा संपणार या यातना?नागपूर शहरातील सांडपाणी नाग नदीतून जाते. त्यामुळे ही नदी दूषित झाली आहे. आता या नदीतील पाणी गोसेखुर्द धरणात जावून मिळत आहे. एकीकडे जलस्तर वाढविण्यासाठी गोसेखुर्दचे पाणी अडविण्यात आले आहे. त्यामुळे बॅकवॉटरमुळे धरण ते भंडारापर्यंत जलस्तर वाढला आहे. त्याचा फटका नदी काठावर वसलेल्या भंडारा शहरासह अनेक गावांना बसत आहे. परिणामी नदी काठावरील पाणीपुरवठा योजनाही प्रभावित झाली आहे.