शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

अटीतटीच्या निवडणुकीसाठी आज मतदान

By admin | Updated: November 19, 2016 00:26 IST

विधान परिषदेच्या भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज शनिवारला मतदान होत आहे.

भंडारा-गोंदिया विधान परिषद निवडणूक : निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज, तिहेरी लढतीत बाजी कोण मारणार? भंडारा : विधान परिषदेच्या भंडारा-गोंदिया स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज शनिवारला मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने संपूर्ण तयारी केली आहे. भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील चार केंद्रांवर मतदान होत असून चारही मतदान केंद्र वेबकास्टद्वारे जोडण्यात आले आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे राजेंद्र जैन, भाजपचे डॉ.परिणय फुके, काँग्रेसचे प्रफुल अग्रवाल यांच्यासह पाच अपक्ष उमेदवार रिंगणात आहेत. प्रमुख पक्षाच्या बलाढ्य उमेदवारांमुळे ही निवडणूक चुरशीची ठरली आहे. या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार नाना पटोले, राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते प्रफुल पटेल, काँग्रेसचे आमदार गोपालदास अग्रवाल यांनी आपला उमेदवार विजयी होण्याची व्युहरचना आखली आहे. आतापर्यंतच्या निवडणुकीत ईतकी चुरस कधी दिसून आली नाही. ईतक्या अटीतटीची ही निवडणूक होत आहे. संबंधित पक्षाचे पदाधिकारी विजय आपल्याच पक्षाचा होईल, असे ठासून सांगत आहेत. राज्यात विधान परिषदेच्या सहा जागांवर निवडणूक होत असली तरी भंडारा-गोंदिया मतदारसंघाच्या निवडणुकीची सर्व सुत्रे दिग्गजांकडून हाताळली जात आहेत. नेत्यांनीच व्युहरचना आखली असल्यामुळे निवडणुकीत कोण बाजी मारेल, हे निकालाअंतीच स्पष्ट होईल. (जिल्हा प्रतिनिधी)या चार केंद्रांवर होणार मतदानया निवडणुकीसाठी भंडारा जिल्ह्यात उपविभागीय अधिकारी कार्यालय भंडारा, उपविभागीय अधिकारी कार्यालय साकोली, गोंदिया जिल्ह्यात तहसिल कार्यालय सडक अर्जुनी व जिल्हाधिकारी कार्यालय गोंदिया असे चार मतदान केंद्र आहेत. अन्य पक्षांच्या मतावर विजयाची मदारया निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडे १२४, भाजपकडे ११९, काँग्रेसकडे १०५ अशी एकूण मतदार संख्या आहे. यातच या तिन्ही पक्षांनी अपक्ष आणि शिवसेनेची मते जुळविल्यामुळे या पक्षाच्या मतांची संख्या जवळपास बरोबरीत आलेली आहे. त्यामुळे दुसऱ्या क्रमांकांच्या मतांशिवाय विजयी होणे कठिण असल्यामुळे या तिन्ही उमेदवारांनी दुसऱ्या क्रमांकाच्या मतासाठी धडपड चालविली होती.मते फुटण्याची शक्यता कमी !ज्या पक्षाच्या गोटात जेवढे मतदार मागील १० दिवसांपासून भ्रमंतीवर आहेत, ते त्यांनाच मतदान करतील अशी शक्यता आहे. १० दिवसांपासून एकत्र असताना कुणी दगा देईल, अशी चिन्हे आजघडीला नाहीत. याशिवाय हे सदस्य ज्या गोटात आहेत, त्यांच्याकडून मतदारांचे भरीव समाधान होत असल्यामुळे मते फुटण्याची शक्यता कमी आहे. निकालाअंतीच हा प्रकार उघडकीस येऊ शकतो. सद्यस्थितीत हे मतदार भंडारा शहरानजिकच्या महानगरात येऊन दाखल झाले असून त्यांचा ताफा शनिवारला सकाळी मतदान केंद्रात पोहोचणार आहे.‘त्या’ मतदारांच्या मतदानाविषयी संभ्रमपवनी नगर पालिकेत पक्षाच्या उमेदवारीवर निवडून आल्यानंतर दुसऱ्या पक्षाशी हातमिळविणी करून ७ नगरसेवकांनी सत्ता स्थापन केली होती. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने या नगरसेवकांना अपात्र ठरविले. याशिवाय गोंदिया जिल्ह्यातील दोन मतदारांना पात्र ठरविण्यात आले तरीसुद्धा जिल्हा प्रशासनाने प्रसिद्धीसाठी पाठविलेल्या पत्रकात ३९३ ही संख्या असल्यामुळे ते मतदान करू शकणार की नाही? हा संभ्रम कायम आहे. यासंदर्भात उपजिल्हाधिकारी (निवडणूक) विजय उरकुडे यांच्याशी संपर्क साधला असता या मतदारांविषयी राज्य निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मागविल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.