शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

गोसेखुर्द धरणाला पर्यटकांच्या भेटी

By admin | Updated: February 1, 2015 22:52 IST

पर्यटन क्षेत्रात झपाट्याने वाढत असलेल्या विदर्भातील सर्वात मोठ्या इंदिरासागर गोसीखुर्द धरणाला यावर्षी जवळपास दोन लक्ष पर्यटकांनी आतापर्यंत भेटी दिल्या आहेत. धरणामध्ये मोठ्या

गोसे (बुज.) : पर्यटन क्षेत्रात झपाट्याने वाढत असलेल्या विदर्भातील सर्वात मोठ्या इंदिरासागर गोसीखुर्द धरणाला यावर्षी जवळपास दोन लक्ष पर्यटकांनी आतापर्यंत भेटी दिल्या आहेत. धरणामध्ये मोठ्या प्रमाणात जलसाठा निर्माण केल्यामुळे धरणाचे सौंदर्य अजूनच खुलले आहे. धरणाचे ह सौंदर्य जवळून पाहून धरणाच्या आठवणी पर्यटक आपल्यासोबत नेत आहेत. रोजच मोठ्या संख्येने पर्यटक धरणाला भेट देत आहेत.गोसेखुर्द धरणाच्या घाटउमरीच्या बाजुने असलेले घनदाट, विस्तीर्ण जंगल, उंच डोंगरदऱ्या, सभोवताल पसरलेले हिरवेगार रान, त्यातून खळखळ वाहणारा धरणाचा उजवा कालवा, त्या बाजुला पिवळी, हिरवी शेत हे मनमोहक दृश्य पाहून या धरणाला भेट देणाऱ्या पर्यटकांचे मन मोहून जाते. यावर्षी गोसीखुर्द धरणाचा जलस्तर वाढविला आहे. आतापर्यंतची सर्वात जास्त २४१ मीटर पाण्याची पातळी धरणामध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे जिकडे पहावे तिकडे समुद्रासारखे अथांग पाणी धरणामध्ये दृष्टीस पडते.या धरणाला परत भेट देण्याची इच्छा साऱ्यांनाच होत असल्यामुळे पर्यटकांची पाऊले धरणाकडे वळत असल्यामुळे दिवसें दिवस येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाटत आहे. धरणाजवळील जंगलाचा उमरेड-कऱ्हांडला-पवनी या नवीन अभयारण्यात समावेश करण्यात आल्यामुळे या अभयारण्यासोबतच गोसीखुर्द धरण हे चांगले पर्यटनस्थळ म्हणून येणाऱ्या दिवसात पुढे येणार आहे. (वार्ताहर)