शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

कुंभली परिसरात विषाणूजन्य तापाची साथ

By admin | Updated: September 4, 2014 23:35 IST

जिल्ह्यात ठिकठिकाणी विषाणूजन्य तापाची साथ असून वेगवेगळ्या तापाच्या रुग्णात दिवसेंदिवस वाढ होत आहे. कुंभली व परिसरातील गावांमध्ये सुद्धा रुग्णांची संस् था दिवसेंदिवस वाढत आहे.

कुंभली : जिल्ह्यात ठिकठिकाणी विषाणूजन्य तापाची साथ असून वेगवेगळ्या तापाच्या रुग्णात दिवसेंदिवस वाढ होत आहे. कुंभली व परिसरातील गावांमध्ये सुद्धा रुग्णांची संस् था दिवसेंदिवस वाढत आहे. डोके दुखणे, ताप येणे, उलटी होणे, शरीर दुखणे इत्यादी लक्षणामुळे कावीळ, टायफाईड, विषमज्वर इत्यादी रोगांची उत्पत्ती होत असून या आजाराबरोबर डेंग्यू या तापाने लोकांना हैराण करून सोडले आहे. सावरबंध, बोंडे येथे डेंग्यू तापाचे रुग्ण आढळले असून नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या आजाराची वाढ होईल अशी चिन्हे दिसू लागली आहेत. खड्यांमध्ये साचलेले पाणी, फवारणीचा अभाव, जनजागृतीचा अभाव यामुळे रोगांवर नियंत्रण न मिळवता उलट डासांचा प्रकोप वाढत आहे. काही रुग्ण जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात किंवा सरकारी रुग्णालयात उपचार न घेता प्रायव्हेट दवाखान्यात उपचार घेत असल्यामुळे सरकार दप्तरी रुग्णांची नोंद बरोबर होत नाही. त्यामुळे शासकीय आरोग्य यंत्रणेनी जलदगती कामाला लागणे आवश्यक आहे. तरच जागृती होईल. या रोगांवर नियंत्रण मिळविण्यासाठी गावागावात आरोग्य शिबिर लावणे, धुर फवारणी करणे, रोगप्रतिबंधक लस देणे इत्यादी उपाय तातडीने करण्याची गरज आहे. विषाणुजन्य आजाराच्या लागणने नागरिक हैराण झाले असून हा आजार वाढत असल्याने त्यांच्यात भितीचे वातावरण पसरले आहे. आरोग्य विभागाने याची दखल घेवून उपाययोजना कराव्यात. (वार्ताहर)