शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळग्रस्त गावांच्या यादीत सिहोरा परिसरातील गावांना ‘डच्चू’

By admin | Updated: April 12, 2016 00:34 IST

सलग दोन वर्षापासून प्रती एकरी २८० किलो धानाचे उत्पादन घेणाऱ्या सिहोरा परिसरातील गावांना दुष्काळग्रस्त गावांच्या यादीत डच्चु देण्यात आले आहे.

शेतकऱ्यांत नाराजीचा सूर : एकाही गावांचा समावेश नाहीचुल्हाड (सिहोरा) : सलग दोन वर्षापासून प्रती एकरी २८० किलो धानाचे उत्पादन घेणाऱ्या सिहोरा परिसरातील गावांना दुष्काळग्रस्त गावांच्या यादीत डच्चु देण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांत नाराजीचा सुर आहे.सिहोरा परिसरात शेतकऱ्यांना सुजलाम सुफलाम करण्यासाठी बावनथडी नदीवर सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प साकारण्यात आलेला आहे. परंतु या प्रकल्पात २०१३ पासून ठिक ठाक नाही. पावसाळ्यात प्रकल्प पाण्याचा उपसा करित आहे. परंतु गेल्या दोन वर्षापासून निसर्गाने अल्प पावसाची हजेरी लावली आहे. निसर्गाच्या पाण्यावर एरवी चांदपुर जलाशयाने ओव्हरफलो पर्यंत मजल मारली आहे. परंतु नाल्यावर जागो जागी बंधारे बांधकाम करण्यात आल्याने चांदपुर जलाशयात निसर्गाचे पाणी पावसाळ्यात पोहचत नाही. या शिवाय बावनथडी नदी पात्राची अशिच अवस्था आहे. दोन महिने पावसाळ्यात दुथडी भरून वाहणारे नदीचे पात्र पाण्यासाठी त्रस्त होत आहे. या आधी वर्षभर या पात्राने पाण्याचा अनुभव घेतला आहे. या नदीवर राजीव सागर धरणात पाणी अडविण्यात आल्याने पात्रात वाहणारे पाण्याचे स्त्रोत बंद झाले आहे.सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प सोबत संलग्नीत असणाऱ्या ३९ गावात शेतकऱ्यांचे चांगभल असल्याचे शासनाच्या नोंदीत दिसून येत आहे. परंतु परिसरात चित्र उलटेच आहे. गेल्या खरीप हंगामात पावसाने दडी मारली असता धानाची रोवणी उशिरा झाली. रोवणी करणारा कालावधी ओलांडल्याने उत्पादनाचा परिणाम शेतकऱ्यांना भोवला. प्रती एकरी २८० किलो धानाचे उत्पादन शेतकऱ्यांनी घेतले. यामुळे पाठबंधारे विभागाची पाणी पट्टी कराची वसुली प्रभावित झाली. विविध सेवा सहकारी संस्थाची क्राप लोन देण्यासाठी शेतकऱ्यांनी पायरी चढली नाही. शेतकरी मोठ्या संख्येने थकबाकी दार झाले. या शेतकऱ्यांना वर्षभर पाण्याचा पुरवठा करण्यासाठी दिल्ली व मुंबई दरबारात नियोजन तयार करण्यात येत नाही. (वार्ताहर)परिसरात सलग दोन वर्षापासून शेतीच्या उत्पादनात कमालीची घट झाली आहे. यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला असून सावरण्यासाठी पाणीपट्टी कराच्या वसुलीत सुट दिली पाहिजे. वैनगंगा नदीवर नवीन प्रकल्पाची गरज आहे.-मोतीलाल ठवकर, जिल्हाध्यक्ष भारतीय किसान संघ सिंदपुरी.