शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
4
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
5
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
6
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
7
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
8
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
9
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
10
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
11
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
12
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
13
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
14
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
15
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
16
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
17
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
18
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
19
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
20
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

व्हॅन दुभाजकावर आदळली

By admin | Updated: March 25, 2015 00:44 IST

भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वसूली पथकाची व्हॅन दूभाजकावर आदळल्याने महिला कर्मचाऱ्यासह इतर चार जण जखमी झाले.

तुमसर : भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वसूली पथकाची व्हॅन दूभाजकावर आदळल्याने महिला कर्मचाऱ्यासह इतर चार जण जखमी झाले. जखमींवर तुमसर येथील सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. राजाराम मंगल कार्यालयासमोर तुमसर-भंडारा मार्गावर हा अपघात रात्री ८ वाजता घडला. येथे दुभाजकावर रिफलेक्टर नाही. मोहाडी सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्षामुळे नेहमी येथे अपघात घडतात.जखमीत व्हॅन चालक प्रविण सार्वे (३६), सुदेश नंदेश्वर (४७), भास्कर गडेकर व सुशिला घोनमोडे यांचा समावेश आहे. मार्च महिन्याचा अखेर असल्याने भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे वसूली पथक तुमसर तालुक्यातील ग्रामीण परिसरात थकबाकीदारांकडे वसूली करीता गेले होते. वसूली नंतर पथक परत भंडारा येथे जात होते. तुमसर-भंडारा मार्गावर राजाराम मंगल कार्यालयाजवळ व्हॅन दुभाजकावर आदळून उलटली. यात बँकेचे चार कर्मचारी जखमी झाले. सुदैवाने पुढील अनर्थ टळला.नागरिकांनी व पोलिसांनी धाव घेवून जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तुमसर पोलीस पुढील चौकशी करीत आहे. पंचायत समिती कार्यालय ते शहरातील श्रीरामनगर रेल्वे फाटकापर्यंत दुभाजक तयार करण्यात आले. बाजार समितीसमोर, राजाराम मंगल कार्यालय तथा गभने सभागृहासमोर दुभाजका समोरील जागा मोकळी आहे. दुभाजकावर रिफलेक्टर नाही. रात्री अंधारात नवीन वाहन चालकांना दिसत नाही. त्यामुळे सरळ वाहन दुभाजकावर आदळतो. विशेषत: तात्काळ खबरदारी म्हणून रिफलेक्टर लावण्याची गरज आहे. चार वर्षापासून ही कामे पूर्णत्वास आली नाही. १५ दिवसापूर्वी बाजार समिती समोर तांदळाने भरलेला ट्रक दूभाजकावर आदळला होता. नियोजनाअभावी हा रस्ता धोकादायक ठरला आहे. (तालुका प्रतिनिधी)