शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
4
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
5
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
6
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
7
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
8
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
9
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
10
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
11
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
12
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
13
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
14
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
15
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
16
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
17
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
18
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
19
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
20
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील मौल्यवान वनसंपदा नष्ट होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:35 IST

तालुक्यातील जंगले मोठी व घनदाट आहेत़. बहुमूल्य अशी वनसंपदा आहे. परंतु शासनाच्या दुर्लक्षामुळे ही वनसंपदा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे़. ...

तालुक्यातील जंगले मोठी व घनदाट आहेत़. बहुमूल्य अशी वनसंपदा आहे. परंतु शासनाच्या दुर्लक्षामुळे ही वनसंपदा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे़. तालुक्यात पागोरा, गोलेवाडी, सोनेगाव, वाकेश्वर, रावणवाडी, एटेवाई, खापा, मौदी, नवरगाव, मेंढा, श्रीनगर, बोरगाव (खुर्द) या गावांत जंगले आहेत़. रावणवाडी, खापा, मेंढा, पागोरा या जंगलात ससे, हरीण, वाघ, रानवराह असे अनेक प्राणी होते, परंतु आता जंगलाचे प्रमाण कमी होत असून या वन्यप्राण्यांच्या वास्तव्याला धोका निर्माण झाला आहे़. जंगलातील प्राणी आपला मोर्चा गावाकडे वळवीत असतात़. १० ते १५ वर्षांपूर्वी जंगलातून एकटे-दुकटे जाणे शक्य नव्हते, पण आजघडीला वन्यप्राणी कमी झालेले आहेत़.

याच जंगलामध्ये मोठ्या प्रमाणावर झाडे व वनौषधी मिळत होत्या, पण ते वृक्ष आता दिसत नाहीत. सोबतच आवळा, बेहळा, हिरडे, बेल, येरून्या, चार, करवंद, टेंभर, सिंदोळे, चिचबिलाई अशी फळझाडेसुद्धा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत़. वनविभागाच्या निष्काळजीपणामुळे ही बहुमूल्य वनसंपदा नष्ट होईल, असे वाटते. वने ओसाड होत चालली आहेत़. मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड होत आहे़. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे. संबंधित विभागाने उपाययोजना करणे गरजेचे आहे. वृक्ष लागवडीसाठी शासन अनेक प्रयत्न व नवनवीन उपक्रम राबवीत असते़. शासनाचेच अधिकारी जंगलमाफियांना वृक्षतोडीचे परवाने देत आहेत़.