शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी आठ, तर सात खासगी रुग्णालयांतून दिली जाणार ज्येष्ठांना लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:41 IST

भंडारा जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात हेल्थ वर्करसह फ्रन्टलाइन कर्मचाऱ्यांना एकूण ८०७९ जणांना कोविड-१९ लस देण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्या ...

भंडारा जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात हेल्थ वर्करसह फ्रन्टलाइन कर्मचाऱ्यांना एकूण ८०७९ जणांना कोविड-१९ लस देण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात ९०२ आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली होती. १ मार्चपासून सुरू होत असलेल्या या मोहिमेत उर्वरित व आगामी टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांसह अन्य कर्मचाऱ्यांना ही लस दिली जाणार आहे.

बॉक्स

१ मार्चपासून खासगी आणि सरकारी रुग्णालयात लस दिली जाणार आहे. यासंदर्भात आरोग्य ॲपअंतर्गत नोंदणी करायची आहे. ज्या सेंटरवर ही लस दिली जाणार आहे तिथे जाऊन संपर्क साधून लसीबाबत माहिती जाणून घेता येणार आहे. याप्रसंगी कोविड नियमांचे पालन करणे ही सर्वांना बंधनकारक करण्यात आले आहे.

बॉक्स

येथे मिळणार कोरोना लस

जिल्ह्यातील सात तालुक्यांतर्गत आठ शासकीय रुग्णालयांमध्ये कोरोना लस दिली जाणार आहे. यात भंडारात दोन ठिकाणी तर मोहाडी, तुमसर, लाखनी, साकोली, पवनी आणि लाखांदूर येथील प्रत्येकी एका सेंटरचा समावेश आहे. तसेच खासगी रुग्णालय अंतर्गत भंडारा येथील पार्वती नर्सिंग होम, पेस हॉस्पिटल व रिसर्च सेंटर, इंद्राक्षी आय केअर, नाकाडे नर्सिंग होम, रंगारी नर्सिंग होम, भुरे हॉस्पिटल तुमसर व तुमसर सिटी मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात ही लस उपलब्ध करून देण्यात आली आहे.

बॉक्स

उर्वरित असलेल्यांनाही मिळणार लस

जानेवारी महिन्यापासून सुरू झालेल्या कोविड लसीकरण मोहिमेत पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्यात शिल्लक असलेले कर्मचारी यांनाही या मोहिमेंतर्गत लसीकरण करण्यात येणार आहे. साधारणतः एकूण लोकसंख्येच्या दहा टक्के ज्येष्ठांची गणना करण्यात येते. यात ज्येष्ठांसह दोन टप्प्यात उर्वरित असलेले लोकांना ही लस देण्यात येणार आहे.