शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

गोबरवाही परिसरात २५ गावांत पोलीस पाटलांची पदे रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:26 IST

तुमसर : गावखेड्यात शांतता प्रस्थापित करणे व गावातील माहिती प्रशासनाला देण्याचे महत्त्वाची जबाबदारी पोलीस पाटील पार पाडतात; परंतु तुमसर ...

तुमसर : गावखेड्यात शांतता प्रस्थापित करणे व गावातील माहिती प्रशासनाला देण्याचे महत्त्वाची जबाबदारी पोलीस पाटील पार पाडतात; परंतु तुमसर तालुक्यातील गोबरवाही परिसरात आदिवासीबहुल २५ गावांत गत काही महिन्यांपासून पोलीस पाटलांची पदे रिक्त आहेत. याबाबत गावातील लोकप्रतिनिधींनी जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले; परंतु अजूनपर्यंत कोणतीच कारवाई प्रशासनातर्फे करण्यात आली नाही.

तुमसर तालुक्यातील गोबरवाही परिसर हा आदिवासीबहुल परिसर मानला जातो. त्या परिसरात एकूण ४४ गावे येतात. त्यापैकी केवळ १९ गावांत पोलीस पाटील कार्यरत असून, इतर २५ गावांत पोलीस पाटलांची पदे रिक्त आहेत. प्रशासनाला तात्काळ माहिती कळविण्याची जबाबदारी पोलीस पाटलांची आहे. त्यामुळे प्रशासनाला गावखेड्यापर्यंत शांतता प्रस्थापित करण्यास मदत होते; परंतु मागील अनेक महिन्यांपासून हे पद न भरल्यामुळे स्थानिक प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. मागील अनेक महिन्यांपासून पोलीस पाटलांची पदे रिक्त आहेत. यासंदर्भात स्थानिक लोकप्रतिनिधींनी जिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकाऱ्यांना याबाबत निवेदन दिले; परंतु त्यावर अद्याप कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. पोलीस प्रशासनानेही जिल्हा प्रशासनाला पोलीस पाटलांची रिक्त पदे भरण्याबाबत कळविले आहे.

या गावात आहेत पोलीस पाटलांची पदे रिक्त : गोबरवाही परिसरातील मोठागाव, गारका भोंगा, गोवारी टोला, हिरापूर हमेशा, चिखली, डोंगरी बुजरूक, लेंडेझरी, गोंडीटोला, गणेशपूर, आष्टी, आलेसूर, कमकासूर, सुसूर डोह, कारली, सीता सावंगी, गुडरी, पांगडी, खापा, पाथरी, बाळापूर, मंगरली, येदर बुची, राजापूर, बाजार टोला या गावांचा समावेश आहे.