शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
3
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
4
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
5
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
6
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
7
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
8
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
9
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
10
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
11
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
12
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
13
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
14
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
15
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
16
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
17
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
18
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
19
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
20
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
Daily Top 2Weekly Top 5

कुलरचा वापर करताना घ्या खबरदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:33 IST

गोंदिया : उन्हाचा तडाका वाढल्याने स्टोअर रूममधून कुलर बाहेर काढण्यात आले आहेत. उकाड्यामुळे घरोघरी कुलरचा वापर वाढला आहे. कुलर ...

गोंदिया : उन्हाचा तडाका वाढल्याने स्टोअर रूममधून कुलर बाहेर काढण्यात आले आहेत. उकाड्यामुळे घरोघरी कुलरचा वापर वाढला आहे. कुलर काळजीपूर्वक वापरून विजेचे अपघात टाळणे व खबरदारी घेणे गरजेचे आहे, असे महावितरण गोंदिया परिमंडळाचे जनसंपर्क अधिकारी अविनाश साखरे यांनी कळविले.

प्राधान्याने मुलांना कुलरपासून दूर ठेवून सतर्कता बाळगणे हितावह ठरणार आहे. उन्हाळ्यात शॉक लागून जीवितहानी अथवा आग लागल्याने वित्तहानी होते. अपघात टाळण्यासाठी कुलरचा वापर नेहमी थ्री-पीन प्लगवरच करावा. घरात अर्थिंग लिकेज सर्किट बेस बसवून घ्यावे. बाजारात हे उपकरण सहज उपलब्ध आहेत. विजेचा धोका संपताच विजेचा पुरवठा बंद होतो. घरातील अर्थिंग योग्य असल्याची तपासणी करून घेणे आवश्यक आहे. कुलरच्या लोखंडी बाह्य भागात वीजपुरवठा येऊ नये, यासाठी कुलरचा थेट जमिनीसोबत संपर्क येईल, अशी व्यवस्था करावी. पाणी भरताना कुलरचा वीजपुरवठा बंद ठेवावा, कुलरमधील पाणी जमिनीवर पडणार नाही, याची काळजी घ्यावी. ओल्या हाताने कुलरला स्पर्श करू नये. ओल्या हाताने किंवा ओल्या जमिनीवर टिल्लू पंप सुरू करू नये, पंपातून पाणी येत नसेल, तर पंपाचा वीज पुरवठा आधी बंद करावा. त्यानंतर प्लग काढल्यानंतर व पंपाला हात लावावा. पंप पाण्यात बुडला नसल्याची खात्री करून घ्यावी. बरेचदा पाण्याची पातळीही खोल गेल्याने पंप सुरू करूनही पाणी खेचले जात नाही. तो पंप एअर लाॅक होतो. अशावेळी प्रायमिंग करणे आवश्यक असते. बऱ्याचदा अज्ञानामुळे चालू पंपाचे प्रायमिंग केले जाते. अशावेळी विजेचा शॉक लागण्याची शक्यता असते. त्यामुळे चालू पंपाचे प्रायमिंग करणे टाळावे. अशाप्रकारे खबरदारी घेणे गरजेचे आहे, असे महावितरण गोंदिया परिमंडळाचे जनसंपर्क अधिकारी अविनाश साखरे यांनी कळविले.