शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील लिपिकांची एकता ठरली लक्षणीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 23:20 IST

राज्यातील विविध २१ विभागातील सुमारे सहा हजार लिपिक संवर्गीय कर्मचारी वेतन समानीकरणासाठी मुंबई येथे मंगळवारी झालेल्या धरणे आंदोलनात सहभागी झाले. वेतनातील तफावत दूर करण्यासह समान काम, समान पदनाम, समान वेतन ही मागणी लावून धरण्यात आली. यावेळी भंडारा जिल्ह्यातील लिपिकांची एकता संपूर्ण महाराष्ट्रात लक्षणीय ठरली.

ठळक मुद्देमंत्र्यांचे आश्वासन : लिपिक संवर्गीय हक्क परिषद आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्यातील विविध २१ विभागातील सुमारे सहा हजार लिपिक संवर्गीय कर्मचारी वेतन समानीकरणासाठी मुंबई येथे मंगळवारी झालेल्या धरणे आंदोलनात सहभागी झाले. वेतनातील तफावत दूर करण्यासह समान काम, समान पदनाम, समान वेतन ही मागणी लावून धरण्यात आली. यावेळी भंडारा जिल्ह्यातील लिपिकांची एकता संपूर्ण महाराष्ट्रात लक्षणीय ठरली.या आंदोलन विजय बोरसे, कार्याध्यक्ष सूर्यकांत इंगळे, सरचिटणीस उमाकांत सूर्यवंशी, राज्य समन्वयक शिवाजी खांडेकर, विजय धोत्रे, संजय कडाळे, राज्य उपाध्यक्ष राजू रणवीर, राज्य महिला संघटक आरती तायडे बापूसाहेब कुलकर्णी, मुकुंद पालटकर, डॉ. गजानन देसाई सहभागी झाले होते. शासनाच्यावतीने हक्क परिषदेच्या शिष्टमंडळास पाचारण करण्यात आले. शासनाच्या वतीने अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी निवेदन स्वीकारले. त्यांनी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले. लिपिक संवर्गीय कर्मचाºयांच्या ग्रेड वेतनातील तफावती दूर करुन वेतन समानिकरणासाठी आश्वासित करून आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. त्यावरून कर्मचाºयांच्या व्यापक हिताचा विचार सायंकाळी आंदोलन मागे घेण्यात आले.शासनाच्यावतीने मागण्या मान्य न झाल्यास जानेवारी महिन्यात राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे काढून आंदोलन करण्याचा इशारा राज्य कार्यकारणीच्यावतीने अध्यक्ष विजय बोरसे यांनी दिला. भंडारा जिल्ह्यातील लिपीकांची एकता संपूर्ण महाराष्ट्रात लक्षणिय ठरली अशी माहिती विभागीय अध्यक्ष केशरीलाल गायधने यांनी दिली.यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभु मते कार्याध्यक्ष मनिष वाहणे, सचिव यशवंत दुणेदार, दिलीप सोनुले, विजय सार्वे, सुधाकर चोपकर माहिला प्रतिनिधी निता सेन, वनिता सार्वे, रगडे, प्रदीप राऊत, संजय झेलकर , प्रदीप सोमवंशी , योगेश धांडे, नितेश गांवडे , रवी भुरे, लक्ष्मीकांत घरडे यांच्यासह जिल्हा व तालुका पदाधिकारी प्रामुख्याने या आंदोलनात सहभागी झाले होते.