शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी...
2
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
3
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
4
Latest Marathi News LIVE Updates: मुंबई-वांद्रे परिसरात पाण्याची पाइपलाईन फुटली, लाखो लीटर पाणी वाया
5
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
6
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
7
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
8
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
9
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
10
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
11
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
12
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
13
दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर सोनम कपूरची अशी झाली अवस्था, फोटो शेअर करत म्हणाली...
14
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
15
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
16
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
17
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
18
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
19
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
20
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

अंडरग्राऊंड पुलाचे काम थंडबस्त्यात

By admin | Updated: April 18, 2015 00:25 IST

रिसामाजवळील स्थानकाला लागून असलेल्या रेल्वे फाटकाचा परिसरातील शेतकऱ्यांना फटका नेहमीच बसत आहे.

रिसामा रेल्वे फाटक : रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा शेतकऱ्यांना फटका आमगाव : रिसामाजवळील स्थानकाला लागून असलेल्या रेल्वे फाटकाचा परिसरातील शेतकऱ्यांना फटका नेहमीच बसत आहे. शेतातील धान, तनस व इतर खरीप, रबीचे पीक रेल्वे फाटकावरुन बैलबंडी किंवा ट्रॅक्टरने आणताना रेल्वे गेट बंद असतो. सततच्या पाठपुराव्यानंतर १२ जुलै २०१२ रोजी सदर फाटकाला अंडर ग्राऊंड पूल मंजूर करण्यात आले. मात्र सदर पुलाचे काम थंडबस्त्यात पडले आहे. रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांना याचा सतत फटका बसत असून सदर काम त्वरित सुरू करण्याची मागणी शामराव बहेकार यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी केली आहे.रिसामा येथील शेतकऱ्यांची मोठी गंभीर समस्या रेल्वे फाटक आहे. नेहमीच रेल्वे गाड्यांचे येणे-जाणे सुरू असते. त्यामुळे अनेकदा फाटक बंद असतो. फाटक उंचावर असल्यामुळे बैलबंडीला तसेच ट्रॅक्टर नेताना मोठी कसरत करावी लागते. कधी बैलबंडी फाटक उंच असल्याने मागे सरकते व संतुलन बिघडून खाली भागात जाते. बैलाचे, बंडी व बंडीवर असलेल्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. तिच स्थिती ट्रॅक्टरची आहे. ब्रेक न लागल्यास ट्रॅक्टर मागे जातो. अशा अनेक घटना या रेल्वेफाटकावर घडलेल्या आहेत. या रेल्वे फाटकाचा क्रमांक-४९७८ असा आहे. दक्षिण-पूर्व रेल्वे नागपूर येथील वरिष्ठ मंडल अधिकारी अभियंता यांनी १२ जुलै २०१२ च्या संदर्भ पत्रात सहायक जनसूचना अधिकारी पत्राचा (सं.का/नाग/सेल/जसूअ ०५/०६/१२श्या तु.ब./२०३ दि. २८/०६/२०१२) संदर्भा देऊन माहिती मागितली. त्यात गेट क्रमांक-४९७८ वरिष्ठ अभियंत्याला सदर अंडर ग्राऊंड चौकी मंजूर झाली का? तसेच जिल्हाधिकारी यांचे नाहरकरत प्रमाणपत्र पाठविण्याची विनंती मंजूर झाली. सदर कामाचे कॉन्ट्रक्ट झाले का? किती उंच व रुंद आहे. एकूण खर्च किती, सन २००८ पासून सतत मागणीकरिता शेतकरी प्रयत्नशील आहे, अशा प्रकारची विचारणा करण्यात आली. दक्षिण पूर्व मध्य मंडळ नागपूरचे वरिष्ठ मंडळ अभियंता यांनी गेट क्रमांक-४९७८ चे काम मंजूर झाले. कामावर जवळपास एक कोटी, ११ लाख, १० हजार २९२ रुपये खर्च अपेक्षित आहे. सदर कामाची निविदा २० जून २०१२ रोजी उघडण्यात आली व मंजूर निविदा विचाराधिन आहे. सदर अंडर ग्राऊंड पुलाची रुंदी ४.२० मीटर व उंची ३.६० मीटर असल्याचे पत्र देण्यात आले. मात्र चार वर्षापासून मंजूर झालेले काम सुरू करण्यात आले नाही. सदर रेल्वे चौकीवर अंडर ग्राऊंड पुलाचे काम त्वरित करण्याची मागणी शामराव बहेकार, संजू बहेकार व शेतकऱ्यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)