शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल मनोऱ्याचे अनधिकृत बांधकाम

By admin | Updated: July 4, 2015 01:29 IST

लोकवस्ती असलेल्या भागत भ्रमणध्वनी कंपनीचे टॉवर उभे करण्याची मनाई आहे. असे असतानाही, भंडारा शहरातील खात रोड

भंडारा : लोकवस्ती असलेल्या भागत भ्रमणध्वनी कंपनीचे टॉवर उभे करण्याची मनाई आहे. असे असतानाही, भंडारा शहरातील खात रोड मार्गावरील रामनगर येथील एका इसमाच्या खाली जागेवर मोबाईल टॉवरचे अनाधिकृत बांधकाम सुरु आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार असून रामनगर सुधार समितीने याबाबद एल्गार पुकारला आहे. खात रोड मार्गावरील रामनगर वॉर्ड हा नगर पालिकेच्या हद्दीत येतो. ही वस्ती अत्यंत वर्दळीची व भरगच्च रहिवास्यांची आहे. या वॉर्डातील १४४ नंबरचा प्लॉट हा भडके नामक इसमाने निवासस्थान बांधण्यासाठी खरेदी केला होता. मात्र तिथे नियमानुसार घराचे बांधकाम न करता तो खाली असल्याने सदर प्लॉट धारकाने एका खासगी मोबाईल कंपनीच्या टॉवर उभारणीसाठी तो करारनाम्यावर कंपनीला दिला आहे. कंपनीसोबत झालेल्या करारनाम्यानुसार कपंनीने खाली प्लॉटवर काही दिवसांपूर्वी टॉवर उभारण्यासाठी मोठे खड्डे खोदण्यात आले. दरम्यान याची माहिती वॉर्ड वासीयांना होताच त्यांनी सदर बांधकामाविषयी माहिती घेतली असता, तिथे एका खासगी कंपनीचे मोबाईल टॉवर उभारण्यात येणार असल्याची बाब समोर आली. त्यामुळे या परिसरातील महिला व पुरुषांनी याला प्रचंड विरोध दर्शविला. मोबाईल टॉवरचे सुरु असलेले बांधकाम बंद करण्यासाठी वॉर्ड वासियांनी रामनगर सुधार समिती गठित केली. या माध्यमातून नगराध्यक्ष बाबुराव बागडे यांना निवेदन देवून टॉवरचे निर्माणाधीन बांधकाम बंद करण्याची मागणी केली आहे. (शहर प्रतिनिधी)ध्वनी लहरींमुळे आरोग्याला धोकामोबाईल टॉवर निर्माण झाल्यानंतर त्यातून निघणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटीक्स् लहरींचा जनमानसावर घातक परिणाम होतो. यामुळे कॅन्सर, हृदयरोग, मेंदुचे आजार, मानसिक आजार अशा दुर्धर आजाराने नागरिक ग्रासले जावू शकतात. पालकांची क्षमता कमी असल्याने याचा फटका त्यांना सहन करावा लागेल. त्या सोबतच येथील जनरेटर व धुरांमुळे वायू प्रदुषणही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. टॉवरच्या बांधकामावर निर्बंध लावाला अशी मागणी परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.