शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

गोसीखुर्द धरणात ईकार्नियाचा विळखा

By admin | Updated: January 9, 2017 00:25 IST

विदर्भातील सर्वात मोठ्या गोसीखुर्द धरणामध्ये ईकार्निया या पाणवनस्पतीची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.

लक्ष्मीकांत तागडे पवनीविदर्भातील सर्वात मोठ्या गोसीखुर्द धरणामध्ये ईकार्निया या पाणवनस्पतीची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. झपाट्याने वाढणाऱ्या या ईकार्निया ने मोठ्या प्रमाणात जलक्षेत्र व्यापले आहे. जिकडे पहावे तिकडे दुरपर्यंत ईकार्नीयाचा समुद्र दृष्टीस पडत आहे. या ईकार्नियामुळे गोसीखुर्द समोर एक नवीन समस्या आली आहे.यापुर्वी ही ईकार्निया भंडारा येथील वैनगंगा नदीमध्ये होती. काही दिवसानंतर ही ईकार्निया पाण्याच्या प्रवाहाने गोसीखुर्द धरणामध्ये वाहत आली. गोसीखुर्द धरणाचे वक्रद्वारे बंद असल्यामुळे ही ईकार्निया वनस्पती धरणामधील पाण्यातच थांबली. या धरणामध्ये थांबलेल्या ईकार्निया ने हळू-हळू वाढण्यास सुरुवात केली. झपाट्याने वाढणाऱ्या या ईकार्निया ने संपुर्ण जलक्षेत्र व्यापून टाकले. त्यामुळे संपूर्ण धरण हिरवे दिसून लागले. धरणामध्ये पाणी आहे की नाही ही शंका येत राहिली.ही ईकार्निया वनस्पती बिनउपयोगाची आहे. ईकार्नियाने संपुर्ण पाणी व्यापून टाकल्यामुळे सुर्याची किरणे पाण्यात पोहचू शकत नाही. त्यामुळे पाण्यातील माशांच्या वाढीवरती परिणाम होत आहे. या ईकार्नियामुळे धरणामध्ये मासेमारी करता येत नाही. त्यामुळे या बिनकामाच्या ईकार्निया ने धरणामधील पाणी झाकल्यामुळे धरणातील पाणी खराब होण्याचीही शक्यता नाकारता येवू शकत नाही. या ईकार्नियावर धरण विभाग व प्रशासनाने लवकरात लवकर नियंत्रण आणून नायनाट करण्याची गरज आहे. नाहीतर ही ईकार्निया संपुर्ण धरणातील जलक्षेत्र व्यापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.पवनी येथील कुऱ्हाडा तलावातील ईकार्नियाचा नायनाट करण्यात आला. तो तलाव गोसीखुर्द पेक्षा किती तरी पटीने लहान होता. ज्या ठिकाणी गटाराचे पाणी जमा होते. त्या ठिकाणी ईकार्निया झपाट्याने वाढते. गोसीखुर्द धरणामध्ये नागनदीचे गटाराचे पाणी जमा झाल्यामुळे ईकार्निया मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जैवीक पध्दतीने ईकार्नियाचा नायनाट करावा लागेल.- प्रकाश पचारे, अध्यक्ष भंजिमसं